शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य हे समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब, विवेकवादी विवेचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 02:04 IST

सम्यक साहित्य संमेलन: ‘मी आणि माझे लेखन’ यावर परिसंवाद

पुणे : ‘साहित्य हे संवेदनशील व्यक्तीच्या भावनांचा निचरा करणारे, समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब, विवेकवादी विवेचन असते’,असा सूर ‘मी आणि माझे लेखन’ या परिसंवादात व्यक्त झाला. सम्यक साहित्य संमेलनातील परिसंवादात युवा कवी सुदाम राठोड, लेखकराकेश वानखेडे, श्रीकांत देशमुख,

सुरेश पाटोळे, इंदुमती जोंधळे, वृषाली मगदूम सहभागी झाले होते. मंगेश काळे हे अध्यक्षस्थानी होते. राठोड म्हणाले, ‘भाषेवरील प्रभुत्व आणि भावनिक राजकारण करता आले म्हणजे चांगली कविता करता येते असे नाही. त्यासाठी विवेक आणि जाणिवा जाग्या असाव्यात. साहित्याला वैश्विक होण्यासाठी दलित साहित्याची गरज पडली. कारण यात वेदना, संताप याबरोबरच विवेकाची जोड होती. सतत आक्रोश, वेदना, विद्रोह हेच म्हणजे दलित साहित्य ही संज्ञा होणे चुकीचे आहे.’जोंधळे म्हणाल्या, ‘जीवनासाठी, भलबुरेपणासाठी, आणि काय चालले आहे हे समजण्यासाठी कलेचा उपयोग व्हायला हवा. माझ्या लेखनाची नाळ जीवनाशी जोडली आहे. आजूबाजूला जे घडत आहे ते बघताना कोणताही संवेदनशील माणूस शांत बसूच शकत नाही. अनुभूतीच्या जाणिवांचा तसेच चिंतन, मनन आणि माणुसकीचा ओलावा लेखनात असायलाच हवा.’काळे म्हणाले, ‘प्रत्येकाने सुरुवातीच्या काळात संतापी असावे आणि स्थिरावले की संशयी व्हावे म्हणजे लेखन फुलते. कोणत्याही साहित्यनिर्मितीसाठी रियाज आवश्यक असतो.’ माणसाच्या वृत्ती, प्रवृत्ती आणि विकृती मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या लेखनातून करतो, असे पाटोळे यांनी सांगितले.‘कवी, लेखक वंचितांविषयी बोलत असतात. त्यामुळे कलावंत, साहित्यिक यांना केंद्रस्थानी ठेवले तरच सुधारणा होऊ शकते. ज्यांना चेहरा नाही, अशांविषयी ते लिहितात. जगण्याचे उर्ध्वपातन म्हणजे लेखन असते.’-देशमुख म्हणाले‘भावनांचा उत्स्फूर्त अविष्कार म्हणजे साहित्य. मी जे अनुभवत गेले, बघत गेले त्यातून माझे लेखन सुरू झाले. एखाद्या स्त्रीच्या समस्येसाठी आंदोलने, संघर्ष, मोर्चे करताना मी फार अस्वस्थ असे. पण एकदा तो प्रश्न सुटला की मी भावनांचा निचरा कथा लेखनातून करते.’-मगदूम म्हणाल्या‘आजचा समाज, समस्या यांचे आकलन, वाचन आणि त्यावर तुमचे भाष्य हे तुमचे लेखन असते. कादंबरी हा लोकशाहीशी हातात हात घालून चालणार प्रकार आहे.’ -वानखेडे म्हणाले

टॅग्स :Puneपुणे