शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

भिगवणला यादीतून शंभर मतदारांची नावे गायब

By admin | Updated: February 22, 2017 01:47 IST

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७४.८१ टक्के मतदान झाले. १ लाख ९९ हजार ४२९ मतदारांनी मतदान केले

इंदापूर : जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७४.८१ टक्के मतदान झाले. १ लाख ९९ हजार ४२९ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये १ लाख ६ हजार ८५१ पुरुष व ९२ हजार ५७८ हजार महिला मतदारांचा समावेश होता. भिगवण येथील मतदार यादीतून शंभर मतदारांची नावे गायब झाल्यामुळे मतदार संतप्त झाले होते. पळसदेव, लाखेवाडी येथील तांत्रिक बिघाडामुळे उशिरापर्यंत मतदान सुरू होते.या निवडणुकीकरिता एकूण २ लाख ६६ हजार ५९१ मतदार होते. त्यामध्ये १ लाख ४० हजार ७२८ पुरुष, तर १ लाख २५ हजार ८३३ महिला मतदारांचा समावेश होता. सकाळी साडेसात वाजल्यापासून तालुक्यातील ३०५ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली. साडेसात ते साडेनऊपर्यंत १६ हजार ५३९ पुरुष व ७ हजार २०३ महिला अशा एकूण २३ हजार ७४२ मतदारांनी मतदान केले. त्याची सरासरी ८.९१ टक्के इतकी होती. सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये उत्साह होता. साडेअकरा वाजेपर्यंत ३७ हजार ४०२ पुरुष व २५ हजार ४२८ महिलांनी मतदान केले. एकूण ६२ हजार ८३० मतदान झाले. सरासरी २३.५७ टक्क्यांपर्यंत पोहोचली.साडेअकरा वाजल्यापासून मतदानाची गती वाढली. दीड वाजण्याच्या सुमारास ५८ हजार ५२७ पुरुष, तर ४९ हजार ३३४ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण १ लाख ७ हजार ८६१ मतदान झाले. सरासरी ४०.४६ टक्के मतदान झाले. कांदलगावमध्ये ८६.३०टक्के मतदान झाले. येथे १३६८ पैकी ११७८ मतदारांनी मतदान केले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्र्यत ७४.८१ टक्के मतदान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळेल. जिल्हा परिषदेच्या पाच ते सहा तर पंचायत समितीच्या नऊ ते अकरा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील, असा दावा पक्षाचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा काँग्रेस पक्ष जिंकेल. इंदापूर पंचायत समितीवरील काँग्रेसची सत्ता अबाधित राहील असा विश्वास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड.कृष्णाजी यादव यांनी व्यक्त केला आहे. कळस व परिसरात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत ८० टक्के मतदान झाले. कळस व परिसरातील बिरंगुडी ,बागवाडी, पिलेवाडी, गोसावीवाडी मध्ये एकूण ५ हजार ४५१ मतदार आहेत. त्या पैकी ४ हजार ३३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी कमी होती. दुपारनंतर मतदान चांगले झाले. बोरी गावामध्ये एकूण ४ हजार ४३७ मतदार आहेत. त्या पैकी ३ हजार २३३ मतदारांनी मतदान केले. तेथे सुमारे ७३ टक्के मतदान झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लाखेवाडी गणातील उमेदवार, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रदीप जगदाळे यांच्या सराटी या गावात ८१ टक्के मतदान झाले. १ हजार २७५ मतदारांनी मतदान केले. वडापूरी येथे ७५ टक्के मतदान झाले. २ हजार १७८ मतदारांपैकी २ हजार ३८५ मतदारांनी मतदान केले. (वार्ताहर)