शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोर : तीस सीसी कॅमेरे बसविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 02:22 IST

 समाजविघातक कामे करणारे व गुन्हेगार पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे काळाची गरज असून, पोलिसांना गुन्हेगारांच्या हलचाली समजण्यासाठी सीसीटीव्हीची मदत होते. त्यामुळे नागरिकांनी गावातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी केले.

लोणी काळभोर - समाजविघातक कामे करणारे व गुन्हेगार पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे काळाची गरज असून, पोलिसांना गुन्हेगारांच्या हलचाली समजण्यासाठी सीसीटीव्हीची मदत होते. त्यामुळे नागरिकांनी गावातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देऊन लोणी काळभोर ग्रामस्थांनी लोकवर्गणीमधून गावात ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला.लोणी काळभोर (ता. हवेली) येथील गावठाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत येथील ग्रामपंचायत कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी महेश ढवाण बोलत होते.लोणी काळभोरच्या सरपंच वंदना काळभोर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या.या वेळी हवेली तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रशांत काळभोर, उपसरपंच योगेश काळभोर, ग्रामपंचायत सदस्य राजाराम काळभोर, रेखा काळभोर, ग्रामविकास अधिकारी बोरामणे, कामगारनेते सोपानराव हाडके, अभिनव चेतना पतसंस्थेचे बाळासाहेब काळभोर, हवालदार रूपेश भगत व गावातील व्यावसायिक उपस्थित होते.या वेळी हवेली तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रशांत काळभोर म्हणाले, ‘‘गावात वाहन पार्किंगचा विषय गंभीर झाला आहे. त्यावर सम-विषम पार्किंगसारखी उपाययोजना करण्याची गरज आहे.’’ या संदर्भात महेश ढवाण म्हणाले, ‘‘दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंगची ठिकाणे ठरवण्यासाठी वाहतूक पोलीस, ग्रामपंचायत, व्यावसायिक यांची एक समिती नियुक्त करून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.’’या संदर्भात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन ढवाण यांनी दिले. उपसरपंच योगेश काळभोर यांनी आभार मानले.पुणे शहरालगत लोणी काळभोर गाव असल्याने उत्तरोत्तर नागरीकरणाचा वेग वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे परिसरातील गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने पोलीस बळ अपुरे आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अत्यंत आवश्यक आहे.सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे पोलिसांना गुन्हेगार जेरबंद करण्यासाठी मदत होईल. या आवाहनाला उपस्थित नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.गावातील सर्व व्यावसायिक, बँक, पतसंस्था, नागरिक वग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने लोकवर्गणी करून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सीसीटीव्हीचे लोकार्पण करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीPuneपुणे