शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना जीवनगौरव पुरस्कार; नवी दिल्लीत रंगला सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 13:27 IST

नवी दिल्ली येथील बाबू जगजीवनराम साहित्य संस्कृती अकादमीतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार पुण्यातील शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देदिल्लीतील १३ व्या आंतरराष्ट्रीय आंतरभाषा विजय दिवस सन्मान संमेलनात पुरस्कार प्रदान वैद्यकीय आणि अहिंसा सेवा क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मान

पुणे : नवी दिल्ली येथील बाबू जगजीवनराम साहित्य संस्कृती अकादमीतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार पुण्यातील शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना प्रदान करण्यात आला. दिल्लीतील राजेंद्र भवनात मंगळवारी झालेल्या १३ व्या आंतरराष्ट्रीय आंतरभाषा विजय दिवस सन्मान संमेलनात लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीराकुमार आणि दिलीचे समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या हस्ते डॉ. गंगवाल यांना हा पुरस्कार देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले.यावेळी बाबू जगजीवन राम कला, संस्कृती व साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नफेसिंह खोबा, नेपाल भारत दलित मैत्री संघाचे अध्यक्ष ओमप्रकाश विश्वकर्मा, सौ. डॉ. चंद्रकला गंगवाल, राज्यसभा खासदार पी. एल. पुनियाजी, डॉ. सत्यनारायण जटियाजी, लोकसभा खासदार डॉ. टी. मेइन्या, राजेंद्र भवनचे सचिव आर. एल. भगत, युवानेते अंशुल अविजित, आमदार शरद चौहान, पुण्यातील महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे, सदस्य प्रसाद आबनावे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. संगमनेर आणि अकोला तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजासाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम गेली अनेक वर्षे डॉ. गंगवाल करीत आहेत. त्याचबरोबर समाजात अहिंसा रुजावी, व्यसनमुक्ती व्हावी आणि पशुबळी विरोधी चळवळ उभारावी, यासाठी डॉ. गंगवाल यांनी व्यापक काम केले आहे. त्यांच्या वैद्यकीय आणि अहिंसा सेवा क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ‘वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सेवेबद्दल झालेला हा गौरव नवी उर्मी देणारा आहे, अशा शब्दांत डॉ. गंगवाल यांनी आनंद व्यक्त केला. 

टॅग्स :PuneपुणेNew Delhiनवी दिल्ली