शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आमदार तानाजी सावंत यांच्या कारखान्याचा परवाना तात्पुरता निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 14:55 IST

पुण्यातील साखर संकुल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी धरणे आंदोलन केले.

पुणे : पुण्यातील साखर संकुल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी दिली, असे खोटे प्रतिज्ञापत्र देणाऱ्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या कारखान्याचा गाळप परवाना रद्द करण्यात या मागणीसाठी शेट्टी यांनी आंदोलन केले होते. त्यांच्या या पवित्र्यानंतर उस्मानाबादच्या भैरवनाथ साखर कारखान्याचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, कारखान्याच्या एफआरपी दराबाबत साखर आयुक्त संभाजी कडू पाटील व स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यात बैठक पार पडली. यावेळी साखर कारखान्यांनी उसाच्या एफआरपीची थकीत रक्कम न देता ती दिल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून गाळप परवाना मिळविलेल्या कारखान्यांचे गाळप परवाने दिलेच कसे ? असा प्रश्न खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांना विचारला. या संदर्भात त्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवेदनही आयुक्तांना सादर केले. यावेळी भैरवनाथ साखर कारखान्याच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर कारखान्याचे अध्यक्ष तानाजी सावंत यांना साखर आयुक्तांनी फोनवर एफआरपी दिली की नाही याची विचारणा केली. त्यावर सावंत यांनी संपूर्णपणे एफआरपी दिली असे सांगितले. त्यावेळी आयुक्तांनी चर्चेसाठी शेट्टी यांच्याशी चर्चा करण्याचे सुचवलेशेट्टी यांच्याकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत, एफआरपी मिळाली नसल्याच्या त्यांचा दावा असल्याचे सांगितले. त्यावर सावंत यांनी, 'मी शिवसेनेचा नेता आहे. मी दहा कारखान्यांचा चेअरमन आहे.एफआरपी दिली, नाही दिली तरी तुमचा काय संबंध? थकीत एफआरपी विषयी आम्ही आणि साखर आयुक्त पाहून घेऊ,' असं सांगितलं. त्यानंतर शेट्टी यांनी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन गाळप परवाना घेणा-या सावंत यांच्या कारखान्याचा गाळप परवाना तात्काळ निलंबित करावा, अशी मागणी करत तिथेच धरणे आंदोलन सुरू केले. अखेर त्यांच्या तक्रारीची दखल घेत या कारखान्याच्या गाळप परवान्याचे तात्पुरते निलंबन करण्यात आले.यावेळी शेट्टी म्हणाले की, सावंत यांनी एफआरपी थकली नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून परवाना मिळवला आहे. त्यांच्या भैरवनाथ शुगर्स कारखान्याचा गाळप परवाना निलंबित करून थकीत एफआरपीची चौकशी व्हायलाच हवी. एफआरपी न दिलेल्या पंधरा कारखान्यावर कारवाई करावी.तसेच ज्या प्रकारे सातारा,सांगली,कोल्हापूरचा एफआरपी तिढा सुटला तसा लवकरच सोलापूर, पुणेसह बाकी महाराष्ट्रचा तिढा सोडवला जाईल.