शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोहगाव विमानतळावर अजून आकारला जातो १८ टक्के जीएसटी; प्रवाशांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 15:03 IST

लोहगाव विमानतळावर अजूनही अनेक खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर १८ टक्के जीएसटी लावला जात असल्याचे वास्तव गुरुवारी उघड झाले आहे़ प्रवाशांना अजूनही त्याचा भुर्दंड बसत आहे़

ठळक मुद्देलोहगाव विमानतळावर अजूनही अनेक खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर लावला जातोय १८ टक्के जीएसटी ज्यांनी १८ टक्क्यांनी जीएसटी आकारणी केली़ त्यांच्यावर कारवाई करणार : अजयकुमार

पुणे : खाद्य पदार्थावरील जीएसटीमध्ये कपात करुन केंद्र सरकारने तो ५ टक्के केला आहे़ त्याची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून देशभर सुरु झाली असली तरी लोहगाव विमानतळावर अजूनही अनेक खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर १८ टक्के जीएसटी लावला जात असल्याचे वास्तव गुरुवारी उघड झाले आहे़ प्रवाशांना अजूनही त्याचा भुर्दंड बसत आहे़ हॉटेल, रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांवर यापूर्वी १८ टक्के जीएसटी लावण्यात आला होता़ त्यावर मोठी टिका होऊन त्याचा फटका हॉटेल व्यवसायावर झाला होता़ शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटपेक्षा विमानतळावरील दर हे नेहमीच जास्त राहत आले आहे़ त्यात त्यावर १८ टक्के जीएसटी लावला जात असल्याने प्रवाशांना त्याचा मोठा भुदंड बसत असे़ परंतु, दुसरी सोय नसल्याने प्रवाशांपुढे पर्याय नव्हता़ यावर मोठ्या प्रमाणावर टिका झाल्यानंतर केंद्र सरकारने १७७ वस्तूंवरील जीएसटीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून सुरु केली़ असे असताना लोहगाव विमानतळावरील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर अजूनही १८ टक्के जीएसटी लावला जात असल्याचे गुरुवारी दिसून आले़ याबाबत रोहित रणधीर यांनी सांगितले, की आपले वडिल जयंतराव रणधीर हे गुरुवारी सकाळी लोहगाव विमानतळावर गेले होते़ तेथे त्यांनी कॉफी घेतली़ त्यांच्या बिलात १८ टक्के जीएसटी आकारण्यात आला होता़ त्यांनी विचारणा केली तेव्हा सर्व ठिकाणी १८ टक्के जीएसटी घेतला जात असल्याचे सांगण्यात आले़ त्यांचे विमान लगेच असल्याने ते तक्रार करु शकले नाही़ त्यांनी ही माहिती व बिल आपल्याला पाठविल्याचे रोहित रणधीर यांनी सांगितले़ 

 

कारवाई करणार : अजयकुमारलोहगाव विमानतळावर अजूनही १८ टक्के जीएसटी लावला जात असल्याचे समजले़ त्यांच्यावर आपण कारवाई करु, असे लोहगाव विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी सांगितले़विमानतळावरील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर अजूनही १८ टक्के जीएसटी लावला जात असल्याचे लोकमत ने त्यांच्या निदर्शनास आणून दिले़ अजयकुमार म्हणाले, जीएसटीतील दरात बदल झाल्यानंतर लोहगाव विमानतळावरील रेस्टॉरंट व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी १४ नोव्हेंबर रोजी आपण बैठक घेतली होती़ त्यात जीएसटी दरात कपात करण्यात आल्याची माहिती देऊन त्याचा फायदा ग्राहकांना मिळाला पाहिजे, असे सांगण्यात आले होते़ अजूनही तेथे जुनाच दर लावण्यात येत असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिले़ ज्यांनी १८ टक्क्यांनी जीएसटी आकारणी केली़ त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, त्याचबरोबर सर्व रेस्टॉरंटची तपासणी करण्यात येणार आहे़

टॅग्स :GSTजीएसटीAirportविमानतळPuneपुणे