शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

फोर्स मोटर्सच्या प्रस्तावावरून बदनामी नको, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना दिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 01:27 IST

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी भाजपाचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले पुढाकार घेऊन काही खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविला होता.

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी भाजपाचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले पुढाकार घेऊन काही खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविला होता. यामध्ये फोर्स कंपनीने दिलेल्या प्रस्तावावर पीएमपीकडून चार दिवसांत अभिप्राय मागविण्यात आला होता. परंतु याकडे पीएमपीने दुर्लक्ष केल्याचे सांगत गोगावले यांनी यापुढे पीएमपीच्या कोणत्याही प्रस्तावांवर निर्णय घेऊ नका, असे आदेश महापौरांना दिले होते. याबाबत फोर्स मोटर्स कंपनीकडून प्रस्ताव पालिकेला नव्हे तर पीएमपीला देणे आवश्यक होते. परंतु अद्यापही फोर्स मोटर्सकडूनअसा कोणताही प्रस्ताव सादर केलेला नाही. त्यामुळे या संदर्भांत नाहक बातम्या निर्माण करून पीएमपीची बदनामी नको, असे लेखी पत्र पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयाना गुंडे यांनी गोगावले यांना दिले आहेत.सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरणासाठी शहर भाजपाच्या वतीने विविध उद्योग समुहांकडून प्रस्ताव व सूचना मागविल्या होत्या. या आवाहनाला प्रतिसाद देत फोर्स कंपनीकडून महिन्यापूर्वी पुणे स्टेशन ते कोथरूड, स्वारगेट ते कोथरूड, पुणे स्टेशन ते वडगाव शेरी या तीनमार्गांवर कंपनीच्या माध्यमातून एसी मिनी बस सेवा देण्याचा प्रस्ताव आयुक्तांना सादर केला होता.या बसची वारवारंता ७ ते १० मिनिटांची असेल. यामध्ये पीएमपीला कोणतीही गुंतवणूक नसेल, मनुष्यबळाची गुंतवणूक आॅपरेटर स्टेक होल्डरच्या वतीने पुरविले जाणार, तीन महिन्यानंतर रेव्हेन्यू शेअरिंग करण्यात येईल, असा हा प्रस्ताव होता.यावर चार दिवसांत अभिप्राय देण्याच्या आयुक्तांनी सूचना देऊनदेखील पीएमपी प्रशासनाने कारवाई केली नाही. त्यामुळे पीएमपीच्या कारभारावर नाराज झालेले गोगावले यांनी महापौर मुक्ता टिळक यांना लेखी पत्र देऊन पीएमपीच्या प्रस्तावांवर निर्णय न घेण्यास सांगितले.पीएमपीसाठी फक्त व फक्तच सीएनजी व इलेक्ट्रीकल बसेसचाच विचार करून वाहतूक सक्षमीकरण करा, असेदेखील स्पष्ट निर्देश दिले आहेत.त्यामुळे फोर्स मोटर्सच्या प्रस्तावाचे नाहक वृत्तांकन होणे, ही पीएमपीच्या व पालिकेच्या दृष्टीने योग्य नाही, असे स्पष्ट लेखी पत्र गुंडे यांनी गोगावले यांना दिले आहेत.>योगेश गोगावले यांना लेखी पत्र देऊन सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सक्षमीकरणासाठीचा प्रस्ताव अद्यापही फोर्स मोटर्स कंपनीकडून पीएमपीला सादर केलेला नाही. तथापी पालिका आयुक्तांकडून १८ जून रोजी हा प्रस्ताव प्राप्त झाला. त्यानंतर त्वरित २० जून रोजी आयुक्त यांच्यासमवेत चर्चा करून सविस्तर टिपणी सादर केली. या शिवाय २६ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ई-बसेस व फोर्समोटर्सबाबात चर्चा केली. या चर्चेत ४०० सीएनजी व १०० डिझेल बसखरेदीबाबत देखील चर्चा झाली. यावेळी यापुढे कोणत्याही परिस्थितीत डिझेल बस खरेदी अथवा भाडेतत्त्वावर न घेण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.- नयना गुंडे, अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएल