शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

डोकलाम संघर्षामुळे चिनी वस्तूंकडे युवकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:37 IST

तुझ्या आपुलकीने बहरावे हे क्षण मैत्रीचे...धुंद होऊन दरवळावे हे क्षण मैत्रीचे... आठवणीत हळुवार जपावे हे क्षण मैत्रीचे... जगण्याचा हा प्रवास असाच चालत राहावा मैत्रीच्या रुपात...

बारामती : तुझ्या आपुलकीने बहरावे हे क्षण मैत्रीचे...धुंद होऊन दरवळावे हे क्षण मैत्रीचे... आठवणीत हळुवार जपावे हे क्षण मैत्रीचे... जगण्याचा हा प्रवास असाच चालत राहावा मैत्रीच्या रुपात... अशा विविध कवितारूपी शुभेच्छांनी रविवारी (दि. ६) ‘फें्रडशिप डे’ साजरा होत आहे. त्यासाठी बारामतीतील दुकाने सज्ज झाली आहेत. बारामतीतील तरुणाई अतिशय उत्साहाने आपल्या मित्रांसाठी फेें्रडशिप बँडसह विविध वस्तूंची खरेदी करीत आहेत. मात्र, सध्या भारत आणि चीन यांच्यात डोकलाम प्रश्नावरून संघर्ष निर्माण झाल्यामुळे चिनी वस्तू खरेदी करण्याकडे युवकांनी पाठ फिरवली आहे. चिनी वस्तूंना बगल देत यावर्षी भारतीय तसेच तुर्की, इटली, थायलंडच्या चॉकलेट वस्तूंचा पर्याय बाजारात उपलब्ध झाला आहे. मंदीतही या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी दिसून आली.आॅगस्ट महिन्यातील पहिला रविवार ‘फें्रडशिप डे’ म्हणून साजरा केला जातो. खास तरुणाईच्या आवडत्या सणासाठी बारामतीतील दुकाने सज्ज झाली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा दिवस उत्साहात साजरा करण्यासाठी बारामती तरुणाई तितक्याच उत्साहाने कॉलेज कट्ट्यावर आपल्या मित्रांबरोबर हा दिवस साजरा करताना दिसतील.यावर्षीच्या ‘फें्रडशिप डे’साठी मॅजेस्टिकमधील बाजारपेठेत विविध भेटवस्तू उपलब्ध आहेत. चॉक लेट्स, फुले, रंगीत बँण्डस बरोबरच मॅग्नेटिक ग्लास, की चेन, पेन स्टँड, ब्रेसलेट, स्माईली मग, पेपर बॅग, फ्रिज मॅग्नेट टेडी, लिटील बुक आॅफ फ्रेंडशिप कोटेशन, कॉफी मग, वॉटर ग्लोब, वुडन फ्लेम, कॅलेंडर, स्माईली मग्स, चॉकलेट बुके, टेडीवेअर, सॉफ्ट टॉईज, वेगवेगळे थम रिंग्स, लकी बॉटल्स, लखोटे, ग्रिटिंग्ज, घड्याळे, फें्र डशिप पिलोज, फें्रड्स कपलिंग्स, फे्रंडशिप्स पेंडंट, म्युझिकल फ्लॉवर्स, किचेन्स, ब्रोच, गिफ्ट बॅग्स,प्लॅस्टिकचे गुलाब, तर चॉकलेटमध्ये विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. बाहुबली चित्रपटासह ट्यूबलाईट चित्रपटाशी संबंधित फेंडशिप बेल्ट यंदा उपलब्ध आहेत, अशी माहिती व्यावायिक राजेंद्र आहेरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बारामतीतील तरुणांचा उत्साह वाखाणण्यासारखा असतो. अगदी आठवडाभर आधीच फें्रडशिप बँड खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते. यंदाचे खास आकर्षण म्युझिकल फ्लॉवर्स, शुभेच्छा देणारे मॅग्नेटिक ग्लास आहे.यामध्ये ‘फे्रंड्स फ ॉंरेव्हर’ लिहिलेला संदेश आहे. ५०० ते ७०० रुपयांपर्यंत असणारे ही फूल आणि हार्टच्या आकारात उपलब्ध आहेत.सोशल मीडियाच्या प्रभावातही ग्रीटिंग कार्डचे अस्तित्वसर्वांचे आवडते ग्रीटिंग्ज कार्ड या सोशल मीडियाच्या प्रभावातही आपले अस्तित्व टिकूू न आहेत. आजच्या जगात खरी मैत्री असणे दुर्मिळ आहे... असं जग म्हणतं... त्या... जगाने कुुठे आपलं नातं अनुभवलंय... मैत्री माझ्या जगण्याचा आधार... मैत्री मनाचे धागे जोडणारे नाते... जगण्याचं गाणं अजून सुंदर करण्यासाठी... मैत्रीची सोबत लाभली, आणि जगणं सुंदर चित्रासारखं बदलून गेलं, असे मैत्रीचे अनेक संदेश देणारी ग्रीटिंग उपलब्ध आहेत.चिनी मालाचे वर्चस्व संपुष्टातयुवकांचे आकर्षण असणाºया ‘फ्रेंडशिप डे’वरचेचायनिज बाजारपेठेचे वर्चस्व संपुष्टात आल्याचे यंदाचे चित्र आहे. चायनाने आणलेल्या विविध वस्तूंना ‘मेड इन चायना’ नको, असे युवावर्गाने सांगितल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. यावर्षी लहान मुलांसाठी बेन १० आणि छोटा भीम, स्पायडर मॅन यांची चित्रे असलेले बॅड उपलब्ध आहेत.