शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात निवडणूक साक्षरतेचे धडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 06:10 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांनी सर्व राज्यांतील उच्च शैक्षणिक संस्थांचे कुलगुरू आणि प्राचार्यांना पत्र पाठविले.

लाेकमत न्यूज नेटवर्कपुणे : नव्या मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी मतदार शिक्षण आणि निवडणूक साक्षरता, याबाबत विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. अभ्यासक्रम आणि उपक्रम राबविण्याबाबत शिक्षण मंत्रालय आणि  राष्ट्रीय निवडणूक आयोग यांच्यामध्ये करार करण्यात आला.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांनी सर्व राज्यांतील उच्च शैक्षणिक संस्थांचे कुलगुरू आणि प्राचार्यांना पत्र पाठविले. त्यामध्ये लाेकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रियेत तरुणांना प्राेत्साहित करून सहभाग वाढविणे गरजेचे आहे. यासाठी निवडणूक आयाेगाच्या वतीने ‘सिस्टीमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन’ (एसव्हीईईपी) हा कार्यक्रम राबविण्यात येताे. त्याच धर्तीवर, मतदार शिक्षण आणि निवडणूक साक्षरता याबाबत विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विविध विद्याशाखांसाठी अभ्यासक्रम तयार करावा आणि त्याला श्रेयांक द्यावेत,  अशा सूचना पत्रात नमूद आहेत.

विद्यार्थ्यांना देणार मतदान प्रक्रियेचे ज्ञानविद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती अवगत व्हावी, यासाठी इव्हीएम, व्हीव्हीपॅट, भारतीय निवडणूक आयोगाचे मोबाइल ॲप, बॅलेट युनिट, मतदान विभाग, कंट्रोल युनिट, पीठासीन अधिकारी, दोन मतदान अधिकारी, पोलिंग एजंट, मतदान कप्पे, नाेटा आदींबाबत शाळा, महाविद्यालयांत माेहिमा, तसेच उपक्रम राबवून शिक्षण द्यावे. तसेच, निवडणूक प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी  ‘मॉक पोल’ म्हणजेच निवडणूक चाचणीही घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिन, २५ जानेवारी रोजी शैक्षणिक संस्थांमध्ये विविध उपक्रमांचे आयाेजन करावे. विद्यार्थ्यांच्या मदतीने मतदार जागृती अभियान राबविण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक