शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यात बिबट्याचा धुमाकुळ; हल्ल्यात महिला गंभीर जखमी, दिड महिन्यातील चौथी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 13:18 IST

गेल्या दीड महिन्यात बिबट्याने साडेतीन वर्षीय चिमुकल्यावर, नऊ वर्षीय मुलावर हल्ला केला होता

राजगुरूनगर : रेटवडी ( ता खेड ) येथे दोन महिलांवर दोन बिबट्यानी वेगवेगळ्या ठिकाणी प्राणघातक हल्ला केल्याची घटना.मंगळवारी (दि १०) सायंकाळी घडली आहे. साडेसहा व आठ वाजता असे दोन हल्ले झाले त्यामुळे ग्रामस्थ भयभयीत झाले आहे. या  हल्ल्यात अरुणा संजय भालेकर (वय,५०, रा सतारकावस्ती ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत.रिजवना अब्दुल पठाण या किरकोळ जखमी झाल्या आहेत.

रेटवडी परिसरातील सतारकावस्ती, बाबळदरा या वस्तीवर बिबट्याने गेल्या दोन महिन्यापासून धुमाकुळ घातला आहे. अरुणा भालेकर हि महिला नातेवाईकाचे लग्न उरकून सांयकाळी घरी एकट्या घरी जात असताना बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.त्यांच्या डोके, तोंडावर बिबट्याने पंजा आणि चावा घेतल्याने गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना सुरुवातीला चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र खोलवर जखमा होऊन रक्तस्राव झाल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पहिल्या म्हणजे साडेसहा वाजता झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात रिजवना अब्दुल पठाण या किरकोळ जखमी झाल्या. रेटवडीच्या पठाण वस्ती येथे हा हल्ला झाला. साडेसहा वाजता हल्ला झाल्यावर ग्रामस्थांनी वनविभागाला कळविले. राजगुरूनगरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप रौधळ, वनपरिमंडळ अधिकारी दत्ता फापाळे, शिवाजी राठोड हे घटनास्थळी पोहोचले.

तेव्हा बिबट्या झुडुपात असल्याचे बॅटरीच्या उजेडात पाहिल्यावर निदर्शनास आले. समोर बिबट्या असतानाच आठ वाजता दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या सतारकावस्तीवर अरुणा भालेकर या महिलेवर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. जखमी महिलेला उपचारासाठी हलविण्यात आले. गेल्या दीड महिन्यात बिबट्याने साडेतीन वर्षीय चिमुकल्यावर, नऊ वर्षीय मुलावर हल्ला केला होता. बिबट्याचा हल्ला होण्याची गावात ही चौथी घटना असुन यामुळे रेटवडी ग्रामस्थांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Khedखेडleopardबिबट्याPoliceपोलिसforest departmentवनविभाग