शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

फुरसुंगीत बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये दहशत 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 8:15 PM

बिबट्याच्याजवळ जाण्यापेक्षा फटाके फोडावेत

ठळक मुद्देबिबट्याच्या हल्ल्यात दोन कुत्र्यांचा मृत्यूपिंजरा लावण्यासाठी वनविभागची असमर्थतता

फुरसुंगी : गेल्या आठवड्यात फुरसुंगी परिसरात बिबट्या नागरिकांना दिसला. त्यानंतर नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. काल रात्री पुन्हा येथील बेंदवाडी परिसरात बिबट्या दिसला. त्याचा फोटो येथील नागरिकांच्या मोबाईलमध्ये आज दिवसभर फिरु लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. बिबट्याने फुरसुंगी परिसरातील सायकर वस्तीवरील दोन कुत्र्यांवर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज वनखात्याने व्यक्त केला आहे.कोरेगांवमूळ येथे वनविभागाने सध्या पिंजरा लावला आहे. तेथून ते काढून दिले जात नाहीत. त्यामुळे सध्या तरी या परिसरात वनविभागाच्यावतीने पाहणी करुन नागरिकांना जागृत केले जात आहे. रात्री बेंदवाडी परिसरात जेथे बिबट्याने दर्शन दिले तेथे त्याच्या पावलाचे ठसे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले आहेत.वनपरिक्षेत्र अधिकारी एम.जे. सणस यांच्या मागदर्शनाखाली लोणी काळभोरचे वनपाल वाय.यू. जाधव व वडकीचे वनरक्षक राहुल रासकर या परिसरात पाहणी करुन उपाययोजना करीत आहेत. आज सायकर वस्ती येथे दोन मृत कुत्री आढळली आहेत. त्याच्या मानेवर ज्या हल्ल्याच्या खुणा दिसत आहेत. त्यावरुन तरी तो हल्ला बिबट्याने केल्याचे पुढे येत आहे. सध्या कोरंगाव मूळ येथे पिंजरा लावलेले आहेत. तेथून काढून दिले जात नाहीत. नागरिकांना जर बिबट्या दिसला तर फटाके फोडावेत. असे वनविभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. शक्यता एकट्याने बाहेर पडून नये. बिबट्याच्याजवळ जाण्यापेक्षा फटाके फोडावेत. दोन दिवसांमध्ये बिबट्याच्या हालचाली आढळल्यास पिंजरा लावण्यात येईल असेही वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरleopardबिबट्याforest departmentवनविभाग