शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

Leopard Attack: लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याची झडप; महिला थोडक्यात बचावली, आंबेगावातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:51 IST

Pune Leopard Attack: बिबट्याने पाठीमागून त्यांच्यावर झडप मारली, अंगावर स्वेटर असल्याने बिबट्याच्या पंजा स्वेटर मध्ये गुंतल्याने स्वेटर फाटले आणि त्या थोडक्यात बचावल्या

अवसरी : पारगाव ता. आंबेगाव चिचगाईवस्ती येथे शनिवारी रात्री नऊ वाजता बिबट्याने अश्विनी शिवाजी ढोबळे (वय २९) या महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न केला असून महिला थोडक्यात बचावली आहे. बिबट्याने महिलेच्या अंगावरील स्वेटर ओढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्या पळून गेला.  घाबरलेल्या अश्विनी ढोबळे यांना पारगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. यावेळी मंचर येथील वनपरिक्षेत्राधिकारी विकास भोसले यांनी रुग्णालयात जाऊन ढोबळे यांची भेट घेऊन घडलेल्या ठिकाणी तातडीने पिंजरा लावला आहे.

याबाबत आधिक माहिती अशी की, अश्विनी शिवाजी ढोबळे या रविवारी रात्री ९ वाजता गाई गोठ्याच्या कडेला लघुशंकेसाठी गेल्या होत्या. बिबट्याने पाठीमागून त्यांच्यावर झडप मारली. अंगावर स्वेटर असल्याने बिबट्याच्या पंजा स्वेटर मध्ये गुंतल्याने स्वेटर फाटले. या हल्ल्यातून ढोबळे थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. मात्र यामुळे अश्विनी या काही वेळ बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना कुटुंबीयांनी तात्काळ पारगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार घेऊन त्यांना पुन्हा घरी सोडण्यात आले. घडलेल्या प्रकार मंचर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांना भ्रमणध्वनीवरून कळविल्यानंतर अधिकारी विकास भोसले व त्यांचे कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची विचारपूस केली त्यानंतर घडलेल्या ठिकाणी वन विभागाच्या वतीने तातडीने पिंजरा लावण्यात आला आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव ढोबळे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रवींद्र करंजखेले, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, भीमाशंकर कारखाना संचालक माऊली आस्वारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी ढोबळे यांचे घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard attacks woman near AmbeGaon; Narrow escape reported.

Web Summary : A woman in Ambegaon was attacked by a leopard while relieving herself. She narrowly escaped with minor injuries after the leopard tried to pull her sweater. Forest officials have set up a cage.
टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याambegaonआंबेगावforest departmentवनविभागWomenमहिला