शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 03:00 IST

हिवरे खुर्द, ओझर येथील ऊसतोडणी करणाºया महिलेवर हल्ला करणाºया बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचा-यांना यश आले आहे. जेरबंद झालेला बिबट्या ६ ते ७ वर्षे वयाचा मादी बिबट असून घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर जेरबंद झाला असल्याची माहिती वनपाल मनीषा काळे यांनी दिली.

आपटाळे : हिवरे खुर्द, ओझर येथील ऊसतोडणी करणाºया महिलेवर हल्ला करणाºया बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचा-यांना यश आले आहे. जेरबंद झालेला बिबट्या ६ ते ७ वर्षे वयाचा मादी बिबट असून घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर जेरबंद झाला असल्याची माहिती वनपाल मनीषा काळे यांनी दिली.मागील काही दिवसांपासून या बिबट्याचे वास्तव्य परिसरात होते. आठ दिवसांपूर्वी पहाटे ऊस तोडणी चालू असताना बिबट्याने महिलेवर हल्ला केला होता. त्यात महिलेचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेमुळे हिवरे खुर्द परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांनी व स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत रास्तारोखोदेखील केला होता. त्यामुळे वनकर्मचारी व अधिकारी यांच्यावर प्रचंड तणाव निर्माण झाला होता.वनविभागाने घटनेनंतर हिरवे खुर्द परिसरात दहा पिंजरे लावले होते. आठ दिवस उलटून देखील बिबट्या पिंजºयात अडकत नव्हता. त्यामुळे नागरिकांचा संताप अधिक तीव्र होत होता. परंतु आज शुक्रवार पहाटे भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला.त्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी जयवंत पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मनीषा काळे, वनरक्षक प्रशांत जाधव, वनमजूर काशिनाथ नवगिरे, खंडू भुजबळ, सुधीर भुजबळ, वनरक्षक कांचन ढोमसे आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्या