शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला परिसरात मंदिरात झोपलेल्या पुजाऱ्यावर बिबट्याचा हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 20:33 IST

निगडे- ओसाडे गावातील मंदिरात झोपलेल्या पुजाऱी बिबट्याच्या हल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

संदीप वाडेकरपुणे (खडकवासला) : पानशेत जवळच्या निगडे- ओसाडे गावातील मंदिरात झोपलेल्या पुजाऱी बिबट्याच्या हल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज पहाटे चारचे सुमारास ही घटना घडली. बिबट्याच्या पंजाचे ठसे मिळाले असून वेल्हे वनपरिक्षेत्राचे अधिकारी आणि कर्मचारी बिबट्याचा मोसे पानशेत खोऱ्यातील जंगलात कसून शोध घेत आहेत. बिबट्याच्या वावराने परिसरात भितीचे सावट पसरले आहे.छबन महादेव जोरकर असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आजोबांचे नाव आहे. आजोबांचे वय साधारण सदुसष्ट वर्षांचे असून जन्मापासून या गावात राहतात. आजोबा नेहमीप्रमाणे रात्री गावातील ओसाडाई देवीच्या मंदिरात ओसरीवर झोपण्यासाठी गेले. पहाटे चारच्या सुमारास मंदिरात कोणीतरी आल्याचा त्यांना भास झाला. ते उठेपर्यंत बिबट्या त्यांच्या जवळ आला होता. बिबट्याने आजोबांवर हल्ला करताच आजोबांनी  पांघरून बिबट्याच्या अंगावर टाकून बचाव केला.  तरीही पंजाने बिबट्याने त्यांना जखमी केले.जोरकर मोठ मोठ्याने ओरडू लागले. त्यांचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा नाना व पत्नी बायडाबाई घरातून धावत ओसरीवर आल्या. त्यावेळी त्यांना जोरकर यांच्या अंथरूण शेजारी बिबट्या दिसला. बिबट्या गुरगुरत होता. त्याला पाहून नाना, बायडाबाई भयभीत झाले .मात्र प्रसंगावधानता दाखवत दोघे माय लेकरे मदतीसाठी आरडाओरडा करू लागले. त्यानंतर बिबट्या तेथून निघून गेला.जखमी अवस्थेत जोरकर यांना उपचारासाठी खडकवासला येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . घटनास्थळी वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी आले असतानाच दुसरीकडे  सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शेजारील निगडे मोसे येथील शेतात बिबट्या शेतकऱ्यांना दिसला. 

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्या