शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बारामती परिसरात बिबट्याचा धुमाकूळ ; शेतकरी दहशतीच्या वातावरणात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 8:44 PM

बिबट्याने शेतकऱ्यांचे जगणे अवघड झाले आहे

ठळक मुद्देभरदिवसा शेतकरी गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बिबट्या गोठ्यात शिरला

बारामती : कन्हेरी येथे बिबट्याने गुरुवारी(दि २३) सकाळीच एका शेतकऱ्याच्या गोठ्यात शिरुन शेळी आणि बोकडावर हल्ला केला.या हल्ल्यात बोकडाचा मृत्यु झाला,तर शेळी जखमी झाली. मंगळवारी(दि. २२) वगळता सलग पाचदिवस बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरुच आहे.लागोपाठ होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकरी दहशतीच्या वातावरणात आहेत.

भरदिवसा शेतकरी गुरुवारी सकाळी साडे सातच्या सुमारास कन्हेरी येथील शेतकरी दिलीप दत्तु काळे यांच्या घरालगत असणाऱ्या गोठ्याच्या भिंतीवर उडी मारुन बिबट्या शिरला.यावेळी बिबट्याने गोठ्यातील प्रथम बोकडाच्या नरडीचा घोट घेतला.त्यानंतर शेळीवर हल्ला केला. यावेळी शेळी जीवाच्या आकांताने ओरडली.शेळीचा आवाज ऐकुन दिलीप काळे यांचे बंधु नानासाहेब काळे धावत आले. यावेळी त्यांनी धाडसाने बिबट्याला हुसकावुन लावले.यावेळी जबड्यातील शेळीला सोडुन बिबट्या आलेल्या मार्गाने उडी मारुन निघुन गेल्याचे त्यांनी पाहिले.या हल्ल्यात शेळी जखमी झाली आहे.  गेल्या सात दिवसांपासुन बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरुच आहे. एका कुत्र्यासह मेंढीआणि शेळीची शिकार आजपर्यंत बिबट्याने केली आहे.तर दोन शेळ्यांना शेतकऱ्यांच्या धाडसामुळे जीवदान मिळाले आहे. शुक्रवारी (दि १७)बिबट्याने येथील एका कुत्र्याची शिकार करुन फडशा पाडला. त्यानंतर लागोपाठ सोमवारी  (दि २०) याच परीसरात मेंढ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला करुन मेंढीची शिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मेंढपाळ महादेव काळे आणि आनंदा केसकर या दोघा मेंढपाळांनी त्याच्यावर काठीने हल्ला केल्याने मेंढी सोडुन बिबट्याने पळ काढला होता. त्यानंतर येथील शेतकरी दत्तात्रय मारूती देवकाते यांच्या शेळीच्या कळपावर मंगळवारी (दि २१) दुपारी ३ च्या सुमारास बिबटयाने हल्ला केला.यावेळी बिबट्याने शेळीची मान जबड्यात धरुन शेळीला फरपटत नेले. देवकाते  यांनी बिबट्याच्या जबड्यातुन शेळी वाचवण्यासाठी प्रयत्न केला.मात्र तो निष्फळ ठरला.वनविभागाने परीसरात पाहणी केल्यानंतर बिबट्याबरोबरच लहान पिलांचे ठसेदेखील आढळुन आले आहेत.त्यामुळे या परीसरात धुमाकुळ घालणारा बिबट्या मादीअसुन त्याच्याबरोबर त्याची पिल्ले असल्याचे स्पष्ट झाले आहे.————————————————...माणसाचा जीव गेल्यावर काय करणाऱ्या हल्ल्याबाबत शेतकरी रामचंद्र काळे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले की,या बिबट्याने शेतकऱ्यांचे जगणे अवघड झाले आहे.रात्री अपरात्री शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रानात जावे लागते.वीजपुरवठ्याची वेळ निश्चित नसल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरुन शेतात पाणी देण्यासाठी जावेच लागते.लवकरात लवकर बिबट्याच्या वावरावर अंकुश निर्माण करण्यासाठी वन विभागाने कार्यवाही करावी

टॅग्स :Baramatiबारामतीleopardबिबट्या