शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 20:54 IST

ऊसतोडणी करणा-या दिलीप गणपत माळी यांच्या दीड वर्षाच्या  वयाच्या मुलावर शुक्रवारी रात्री बिबट्याने जीवघेणा हल्ला करून जखमी केले.

ठळक मुद्देधोलवड जवळील मुंढेवाडी येथील घटना : मुलगा जखमीपिंपरी चिंचवड येथील वाय सी.एम रुग्णालयात उपचार सुरू 

ओतूर:  धोलवड (ता.जुन्नर ) जवळील मुंढेवाडी येथे ऊसतोडणी करणा-या दिलीप गणपत माळी यांच्या दीड वर्षाच्या  वयाच्या मुलावर शुक्रवारी रात्री बिबट्याने  जीवघेणा हल्ला करून जखमी केले. या घटनेमुळे परिसरात दशहत पसरली आहे. जखमी मुलावर पिंपरीचिंचवड येथील वायसीएम रूग्णालयात उपचार सुरू आहे अशी माहिती वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बापूसाहेब येळे यांनी दिली. ज्ञानेश्वर  दिलीप माळी  असे जखमी चिमुकल्याचे नाव आहे.   धोलवड व मुंढेवाडी सीमेवर ऊस तोडणी सुरु आहे.  शुक्रवारी (दि १९) रात्री ऊसाच्या  शेतातील मोकळ्या जागेत पंधरा ते वीस ऊसतोडणी कामगार झोपले होते. याच शेतात ऊसतोडणी कामगार दिलीप गणपत माळी व त्यांची पत्नी दिपाली दिलीप माळी झोपले होते. त्यांच्या मध्ये त्यांचा दीड वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वर झोपला होता.  अंधाराचा फायदा घेऊन रात्री दीडच्या सुमारास बिबट्याने  मुलाच्या डोक्यावर  डाव्या डोळ्यावर, कानावर पंजे मारून जखमी केले. त्यामुळे  बाळ मोठ्याने रडू लागले. बाळाच्या आवाजाने आई दिपाली जागी झाली. बिबट्याला पाहताच तीने तीने धाडसाने बिबट्याला हाताने मारुन आरडाओरडा केला. तेव्हा सर्व कामगार जागे झाले. त्यांनीही  आरडाओरडा केल्याने बिबट्या मुलाला सोडून शेतात पळाला.   या घटनेची माहिती ओतूर वनविभागाला कळविण्यात आली. ओतूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल बापूसाहेब वेळे, वनपाल व्ही.आर. अडागळे, एच. एन. नागरगोजे,   एच. एन. पवार, एस.  एन. जराडे, वनमजूर फुलचंद खंडागळे, किसन केदार घटनास्थळी हजर झाले. जखमी बाळाला  व्ही.आर अडागळे व राठोड यांनी प्रारंभी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पिंपरी चिंचवड येथील वाय सी.एम रुग्णालयात दाखल केले. जखमी बाळाची प्रकृती सध्या स्थिर आहे. .............. वनपरिक्षेत्र अधिकारी व इतरांनी घटना स्थळाचा  पंचनामा करून बिबट्यालाला जेरबंद करण्यासाठी तात्काळ पिंजरा लावण्यात आला आहे. पंचनामा करताना घटनास्थळी ऊसकामगारांची टोळी दिसून आली. आजूबाजूला ऊसाची शेती व जवळच नदी चे क्षेत्र आहे. रात्री दीड वाजता बिबट्याने आई वडिलांच्या मध्ये जखमी झालेले बाळ झोपले होते अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याने हल्ला केला.

टॅग्स :Junnarजुन्नरleopardबिबट्या