शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यात पुन्हा बिबट्याचा हल्ला; जऊळके खुर्दमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला रक्तबंबाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 10:10 IST

या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

राजगुरुनगर : गेल्या काही दिवसांपासून खेड तालुक्याच्या पुर्व भागातील रेटवडी, जऊळके या परिसरात बिबट्याने धुमाकुळ घातला आहे. जऊळके (ता. खेड) येथे आज दि. १२ पहाटे साडेपाच वाजता बिबट्याने एका महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीररित्या जखमी झाली असून उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.

जऊळके खुर्द येथील वरची वस्ती येथे आज पहाटे लता शिवाजी बोऱ्हाडे (वय ५० ) या महिलेवर घराशेजारीच नरभक्षक बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या डोक्याला पाठीमागच्या बाजूने गंभीर खोलवर जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर महिला जाग्यावरच कोसळली. त्यानंतर तत्काळ उपचारासाठी त्यांचा मुलाने चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. या घटनेची खबर वन विभागाला देण्यात आली.

वनरक्षक शिवाजी ढोले, एस, के,अरुण यांनी  ग्रामिण रुग्णालयात धाव घेतली. महिलेच्या डोक्याला खोलवर जखम असल्याने व मोठा रक्तस्राव झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले. रेटवडी, जऊळके हा परिसर दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. दोन दिवसांपूर्वी रेटवडी येथे दोन महिलावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. आज पुन्हा बिबट्याने हल्ला केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडleopardबिबट्या