शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

'अपनी गली में कुत्ता भी शेर होता है'; चक्क कुत्र्यानेच जबड्यात धरले बिबट्याचे तोंड, पाहा थरारक VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 17:13 IST

आतापर्यंत आपण बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्याचा बळी जात असल्याच्या घटना पाहिल्या, पण पुण्यात चक्क एका कुत्र्यानेच बिबट्याला आपल्या जबड्यात पकडल्याची घटना घडली आहे. शिकारी बनून आलेला बिबट्या स्वतः कुत्र्याची शिकार झाला.

पुणे- आतापर्यंत अनेकदा आपण बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्याचा बळी जात असल्याच्या घटना पाहिल्या आहेत. पण, पुण्यात याच्या एकदम उलट घटना घडली आहे. पुण्यातील आंबेगाव येथे हल्ला करण्यासाठी आलेल्या बिबट्याचा कुत्र्याने पाठलाग केला आणि त्याला आपल्या जबड्यात पकडले. शिकारी बनून आलेला बिबट्या स्वतः कुत्र्याची शिकार झाला. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होतोय.

हिंदीत म्हण आहे, 'अपनी गली मे कुत्ता भी शेर होता है.' याचा प्रत्यय पुण्यातील या घटनेवरुन येतो. एका पाळीव कुत्र्याने चक्क बिबट्याला मात देत त्याला पळवून लावले आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओही मोबाईलमध्ये चित्रित झाला असून सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. आंबेगावच्या गणेश शेवाळे यांच्या घरातील पाळीव 'वाघ्याने' चक्क बिबट्याला स्वतःच्या जबड्यात धरले.

विशेष म्हणजे, मागील 15 दिवसांमध्ये दोनवेळा वाघ्याचा बिबट्यासोबत सामना झाला आणि दोन्हीवेळा त्याने बिबट्याला पळवून लावले आहे. हल्ला करण्यासाठी आलेल्या बिबट्याला वाघ्याने 25-30 सेकंद त्याच्या जबड्यात धरले. यादरम्यान जखमी बिबट्याने कशीबशी स्वतःची सुटका करुन घेतली आणि तेथून पळ काढला.

ग्रामस्थांची बिबट्याला पकडण्याची मागणी

घटनेचा व्हिडिओ बनवणाऱ्या गणेश शेवाळे यांनी सांगितले की, 'रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. दोघांमध्ये चांगलीच लढत झाली, पण आमच्या 'वाघ्या'(कुत्रा)ने बिबट्याला पळवून लावले.' गेल्या अनेक वर्षांपासून परिसरात बिबट्याची आणि इतर वन्य प्राण्यांची दहशत आहे. वनविभाग व ग्रामपंचायतीने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. यावेळी ग्रामस्थांनी वनविभागाला बिबट्याला पकडण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणेdogकुत्रा