शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कायदा तोडणाऱ्यांचे हात पाय तोडले पाहिजे : महेश झगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 13:31 IST

‘कायदे हे जनतेच्या गरजेपोटी निर्माण झालेली व्यवस्था आहे..... मात्र.. त्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नाही : महेश झगडे

ठळक मुद्देई-फार्मसीची अंमलबजावणी जर येणाऱ्या प्रस्तावित कायद्यानुसार झाली तर त्यामध्ये अयोग्य काय ?

पुणे : देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी महात्मा गांधी यांनी कायदेभंगाची चळवळ सुरू केली, मात्र दुर्देवाने स्वातंत्र्यानंतरही नागरिकांनी ही कायदेभंगाची चळवळ पुढे चालू ठेवली आहे, कायद्यांचे सर्रास उल्लंघन होत आहे. कायदा जर कुणी तोडत असेल तर त्यांचे हात पाय तोडले पाहिजेत, असे संतप्त मत माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी व्यक्त केले. सजग नागरिक मंचच्यावतीने आयोजित ‘आॅनलाइन फार्मसी रूग्णांसाठी योग्य कि अयोग्य?’ या विषयावरील आयोजित चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनंत फडके, भारती विद्यापीठ फार्मसी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आत्माराम पवार, केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी विजय चंगेडिया यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. यावेळी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर, जुगल राठी उपस्थित होते.झगडे म्हणाले, ‘‘कायदे हे जनतेच्या गरजेपोटी निर्माण झालेली व्यवस्था आहे. लोकहिताच्या दृष्टिकोनातून पुढे आलेल्या मागण्यांमधून कायद्यांची निर्मिती होते. अनेक चांगले कायदे निर्माण होतात. मात्र, त्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नाही. औषध विक्री करता अस्तित्त्वात असलेल्या कायद्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी झाली नाही म्हणून आज डायलासिसचे अनेक केंद्र उभारावे लागत आहेत.’’ ई-फार्मसीबाबत कायदा करण्यात यावा अशी मागणी रूग्णांकडून झाल्याचे एकही उदाहरण नाही. तरीही हा कायदा केला जातोय. ई-फार्मसीमधून उभ्या राहणाऱ्या मोठया व्यापार व्यवस्थेचाच हा एक भाग आहे. या ई-फार्मसीचे काय परिणाम होणार आहेत याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. ई-फार्मसी नसेल तर रूग्णांचे काहीही नुकसान नाही. मात्र ते अस्तित्त्वात आल्यास त्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम होणार आहेत. यामुळे अनेक लोक बेरोजगार होतील. त्यामुळे ई-फार्मसीची आवश्यकता नाही, असे झगडे यांनी स्पष्ट केले.विजय चंगेडिया म्हणाले, ‘‘आॅनलाइन फार्मसीच्या माध्यमातून बनावट औषधे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याचा एक मोठा धोका संभवतो. गर्भनिरोधक गोळया, व्हायग्रा अशी औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकली जाण्याचाही धोका आहे. आपल्या एफडीएला शून्य अधिकार आहेत. ते पत्र पाठविण्या पलीकडे काही करू शकणार नाहीत. त्यामुळे आमचा आॅनलाइन फार्मसीला विरोध आहे.’’...............जर कायद्यानुसार झाले तर अयोग्य कायई-फार्मसीची अंमलबजावणी जर येणाऱ्या प्रस्तावित कायद्यानुसार झाली तर त्यामध्ये अयोग्य काय आहे. कायद्यानुसार कार्यवाही झाली तर त्याचे डॉक्टर व रूग्ण या दोहोंचे काहीही नुकसान नाही असे डॉ. अनंत फडके यांनी सांगितले. खरा प्रश्न दर्जाहीन, महागडया औषधांना आहे. त्याला पर्याय म्हणून जनरिक औषधांचा स्वीकार होणे आवश्यक असल्याचे फडके यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेmedicineऔषधंdialysisडायलिसिसVivek Velankarविवेक वेलणकर