शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरचा शुभारंभ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 02:57 IST

स्पर्धात्मक आणि सातत्याने नवनवीन आव्हाने तयार करणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना नवीन मार्ग दाखविण्याची धडपड पालकांची सुरू असते. या सगळ्यात त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घेईल या प्रकारचे क्षेत्र निवडण्याकरिता योग्य प्रदर्शनाची गरज भासते.

पुणे : स्पर्धात्मक आणि सातत्याने नवनवीन आव्हाने तयार करणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना नवीन मार्ग दाखविण्याची धडपड पालकांची सुरू असते. या सगळ्यात त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घेईल या प्रकारचे क्षेत्र निवडण्याकरिता योग्य प्रदर्शनाची गरज भासते. ती गरज लोकमतच्या अ‍ॅस्पायर एज्युके शन फे अरने पूर्ण केली आहे, असे मत कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल यांनी ुव्यक्त केले; तसेच हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देणारे ठरेल, यात शंका नाही अशी आशाही व्यक्त केली.‘लोकमत’तर्फे गेल्या सहा वर्षांपासून आयोजित करण्यात येणाºया ‘अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१८’ चे उद्घाटन गोयल यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाला स्टेट बँक आॅफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक पश्चिम पुण्याचे आकाश गुप्ते, दिशा अ‍ॅडस्चे रवी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. गोयल म्हणाले की, पूर्वीच्या काळी दहावी आणि बारावीनंतर बीए, बीकॉम, बीएस्सी यापुरतेच शिक्षण मर्यादित होते. आता मात्र करियरच्या प्रचंड संधी उपलब्ध झाल्या असून, त्यासंबंधीची माहिती सर्वसामान्य पालकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सभोवताली विविध क्षेत्रामध्ये वाढणारी संधी पाहता करिअर मार्गदर्शनाची मोठी गरज जाणवू लागली आहे. ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून एकाच छताखाली करिअर मार्गदर्शन आणि पालकांशी संवाद या गोष्टी होत असल्याने हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देणारे ठरेल. असा विश्वास वाटतो. प्रदर्शनाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे पवित्र कार्य होत असताना, त्यात मोठ्या संख्येने पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना गुप्ते म्हणाले की, एसबी आयच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक कर्ज योजना ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. राज्यात कुठेही; तसेच भारताबाहेरदेखील शिक्षण घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी बँक तत्पर राहणार आहे; मात्र या सगळ्यात विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांनी पालकांचा विश्वास सार्थ करण्यासाठी मेहनत घ्यायला हवी. संघर्ष आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवण्यावर भर द्या. असा सल्ला देत त्यांनी उज्ज्वल करिअरसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.रविवारपर्यंत सुरू राहणाºया प्रदर्शनात सकाळी दहा ते रात्री ७ पर्यंत पालक - विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. प्रदर्शनात सर्वांना प्रवेश व पार्किंग विनामूल्य असून, नामांकित शैक्षणिक संस्था तिथे चालणाºया अभ्यासक्रमाची व प्रवेशप्रक्रियेची माहिती पालक व विद्यार्थ्यांना मिळणारआहे.कला, वाणिज्य, विज्ञान या सारख्या पारंपरिक शाखांबरोबरच अभियांत्रिकी, वैद्यकीय, आर्किटेक्चर, फॅशन, अ‍ॅनिमेशन, एव्हिएशन, मीडिया, व्होकेशनल कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, यासारख्या विविध प्रोफेशनल कोर्सेस, स्पर्धा परीक्षा यांची माहिती मिळणार आहे.प्रदर्शनातील आजची मार्गदर्शन सत्रे४दु. ११ वाजता स्पर्धा परीक्षा आणि त्याची तयारी-जवाद काझी, युनिक अ‍ॅकॅडमीस्पर्धा परीक्षांची तयारी, त्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट, एकाग्रता आणि अभ्यासाचे नियोजन अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन.४दु. १२ वाजता अ‍ॅनिमेशन डिझाईन करिअरची यशोगाथा-संतोष रासकर, सृजन कॉलेज आॅफ डिझाईननव्याने उदयास आलेल्या अ‍ॅनिमेशन या क्षेत्रातील भविष्याच्या संधी आणि या क्षेत्रातील नोकरी-व्यवसायाच्या अनेक वाटा, याबद्दलचे मार्गदर्शन४दु. ४ वाजता करिअर इन व्हीएफएक्स आणि अ‍ॅनिमेशन-अमित छेत्री, फ्रेम बॉक्स अनिमेशन अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स तंत्रज्ञान, गेमिंग अशा तंत्रज्ञानांचा मोबाईल, चित्रपट अशा माध्यमातील वाढता वापर आणि रोजगाराच्या वाढत्या संधी.४सायं. ५ वाजता करिअर इन एव्हिएशन-एम. आर. पाटकर, शास्त्री गु्रपपारंपरिक अभ्यासक्रमाबरोबर नव्याने उदयास आलेला हा अभ्यासक्रम आणि तरुणांना अभ्यासाचा नोकरीमधील मोठा मोबदला देणारे क्षेत्र व त्यातील करिअरच्या संधी.प्रदर्शनाचे स्थळ व वेळ४आज, रविवार, दि. १० जून.४सकाळी १० ते सायं. ७.४गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे.४प्रवेश व पार्किंग विनामूल्य४दहावी,बारावी, टऌ-उएळ, खएए/ठएएळ चा निकाल लागल्याने विद्यार्थी आणि पालकांना एकाच छताखाली इच्छित शैक्षणिक संस्थेची माहिती घेता येणार असल्याने ही प्रदर्शनालाभेट देण्याची अचूक वेळ आहे.शिक्षणाच्या अगणित संधी४कला, वाणिज्य, विज्ञान यांसारख्या पारंपरिक शाखांबरोबरच अभियांत्रिकी, वैद्यकीय, आर्किटेक्चर, फॅशन, अ‍ॅनिमेशन, एव्हिएशन, मीडिया, व्होकेशनल कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कोचिंग क्लासेस, प्रोफेशनल कोर्सेस, स्पर्धा परीक्षा अशा शाखांची माहिती एकाच ठिकाणी मिळाल्याने विद्यार्थी व पालकांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे.प्रदर्शनातील सहभागी नामवंत शिक्षण संस्था- शैक्षणिक संस्थेचे नाव : युनिक अ‍ॅकॅडमी. - कॅम्पस : एफ. सी. कॉलेज रस्ता, शिवाजीनगर.  अभ्यासक्रम : एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन.  शैक्षणिक संस्थेचे नाव : मराठवाडा मित्रमंडळ. कॅम्पस : डेक्कन, कर्वेनगर, लोहगाव, काळेवाडी.  अभ्यासक्रम : इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल, पॉलिटेक्निक, एलएलबी, कला-वाणिज्य-विज्ञान, एमबीए आणि इंटेरियल डिझाईनिंग.  शैक्षणिक संस्थेचे नाव : डी. वाय. पाटील, आकुर्डी.  कॅम्पस : आकुर्डी, जे. एम. रोड अभ्यासक्रम : इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, बायोटेक, एमसीए, एमबीए, अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट.  शैक्षणिक संस्थेचे नाव : सूर्यदत्ता गु्रप आॅफ इन्स्टिट्यूट.  कॅम्पस : बावधन.  अभ्यासक्रम : बीबीए, बीसीए, बीसीएस, अ‍ॅनिमेशन, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए, एमसीएस, एमकॉम, इंटेरियल फॅशन डिझाईनिंग, कला-वाणिज्य-विज्ञान. शैक्षणिक संस्थेचे नाव : के ११ अ‍ॅकॅडमी आॅफ फिटनेस सायन्सेस.  कॅम्पस : शिवाजीनगर. अभ्यासक्रम : पर्सनल ट्रेनर आणि स्पोर्टस न्यूट्रिशन. शैक्षणिक संस्थेचे नाव : फ्रेम बॉक्स अ‍ॅनिमेशन अ‍ॅँड व्हीएफएक्स. कॅम्पस : घोले रोड, शिवाजीनगर.  अभ्यासक्रम : बीसीएस, अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स, ग्राफिक डिझाईनिंग, गेमिंग, वेब डिझाईनिंग/डेव्हलपमेंट, फोटोग्राफी आणि व्हिडिओ एडिटिंग.  शैक्षणिक संस्थेचे नाव : जेएसपीएम इम्पेरियल कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग.  कॅम्पस : वाघोली. अभ्यासक्रम : इंजिनिअरिंग इन सिव्हिल/कॉम्प्युटर/मेकॅनिकल/इलेक्ट्रीकल /इ अ‍ॅँड टीसी.  शैक्षणिक संस्थेचे नाव : जय क्रांती कॉलेज.  कॅम्पस : कात्रज.  अभ्यासक्रम : बीबीए, बीसीएस, एमसीएस.  शैक्षणिक संस्थेचे नाव : महेश शिंदेज् ज्ञानदीप अ‍ॅकॅडमी.  कॅम्पस : सदाशिव पेठ. अभ्यासक्रम : एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन.  शैक्षणिक संस्थेचे नाव : संजय घोडावत युनिव्हर्सिटी.  कॅम्पस : कोल्हापूर. अभ्यासक्रम : बीबीए, एमबीए, बीटेक-एमटेक, बीएससी, एमएससी, बीए, एमए, पीएच.डी. शैक्षणिक संस्थेचे नाव : पुणे डिस्ट्रीक एज्युकेशन असोसिएशन. कॅम्पस : कोथरूड. अभ्यासक्रम : आर्किटेक्चर इंजिनिअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, लॉ, कला-वाणिज्य-विज्ञान, आयुर्वेद.  शैक्षणिक संस्थेचे नाव : झील एज्युकेशन सोसायटी. कॅम्पस : नºहे. अभ्यासक्रम : इंजिनिअरिंग, एमबीए, एमसीए. शैक्षणिक संस्थेचे नाव : डी.वाय.पाटील टेक्निकल कॅम्पस्, आंबी. कॅम्पस : तळेगाव दाभाडे. अभ्यासक्रम : डिप्लोमा आणि डिग्री- आॅटोमोबाईल, सिव्हिल कॉम्प्युटर, मेकॅनिकल आणि ई अ‍ॅँड टीसी. शैक्षणिक संस्थेचे नाव : मॉडर्न कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग  कॅम्पस : शिवाजीनगर अभ्यासक्रम : इंजिनिअरिंग- कॉम्प्युटर, मेकॅनिकल, आयटी, ई अ‍ॅँड टीसी, इलेक्ट्रीकल, एमबीए आणि एमसीए. शैक्षणिक संस्थेचे नाव : अरेना अ‍ॅनिमेशन औैंध : औंध, एफसी रोड, बंडगार्डन, विमाननगर, टिळक रोड. अभ्यासक्रम : व्हिएफएक्स, अ‍ॅनिमेशन, वेब डेव्हलपमेंट, २डी/३डी/ एआर/युआर आणि गेमिंग. शैक्षणिक संस्थेचे नाव : अर्लाड कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग. कॅम्पस : हिंजवडी. अभ्यासक्रम : इंजिनिअरिंग, एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए, फार्मसी, ११वी व १२वी. शैक्षणिक संस्थेचे नाव : अ‍ॅपटेक लर्निंग. कॅम्पस : डेक्कन, औंध. अभ्यासक्रम : एव्हिएशन, आयटी, हार्डवेअर, बॅँकिंग, इंग्रजी संभाषण. शैक्षणिक संस्थेचे नाव : इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्स नेटवर्क अ‍ॅँड टेक्नॉ. कॅम्पस : जे एम रोड, हडपसर, चिंचवड. अभ्यासक्रम : एथिकल हॅकिंग आणि सायबर सिक्युरिटी, एमएनएसटी. शैक्षणिक संस्थेचे नाव : सृजन कॉलेज आॅफ डिझाईन. कॅम्पस : शनिवारवाडा.  अभ्यासक्रम : मल्टी मीडिया अ‍ॅनिमेशन, इंटेरियल डिझाईन, व्हीएफएक्स, ग्राफिक्स डिझाईन, वेब डिझाईन. शैक्षणिक संस्थेचे नाव : इंडियन मॉडेल स्कूल अ‍ॅड ज्यु. कॉलेज. कॅम्पस : मुळशी  अभ्यासक्रम : १२वी विज्ञान, आयआयटी, जेजेई, नीट, सीईटी परीक्षांची तयारी.  शैक्षणिक संस्थेचे नाव : सिम्बायोसिस स्कील्स अ‍ॅन्ड ओपन युनिव्हर्सिटी. कॅम्पस : किवळे (पुणे). अभ्यासक्रम : रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टीक सप्लाय चेन मॅनेजमेंट, आॅटो मोबाईल/मेकॅट्रॉनिक/कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग, बीएस्सी, आर्किटेक्चर.  शैक्षणिक संस्थेचे नाव : झी इन्स्टिट्यूट आॅफ क्रिएटिव्ह आर्टस् ल्ल कॅम्पस : कर्वेरोड  अभ्यासक्रम : ३डी

टॅग्स :educationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्रLokmatलोकमत