शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अनाथांच्या चेहऱ्यावर झळकले हास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:23 IST

शेलपिंपळगावातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा उपक्रम; मायेच्या ओलाव्याने मुलांच्या डोळ्यांत पाणी

शेलपिंपळगाव : भाऊ म्हणजे कर्तव्य... बहीण म्हणजे वात्सल्य, असे हे परमपवित्र भावाबहिणींचे नाते रक्षाबंधनाच्या निमित्त दृढ होते. मात्र, समाजातील काही संस्था आगळेवेगळे सामाजिक उपक्रम राबवून आदर्श निर्माण करतात. असे कार्य शेलपिंपळगावच्या जय हरी ग्रुपच्या महिला सदस्यांनी केले असून, ज्यांना कोणी नातेवाईक नाहीत अशा अनाथ मुलांना राख्या बांधून त्यांच्याही जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील संपर्क अनाथाश्रमातील मुलांचा राखी पौर्णिमेचा दिवस भलताच आनंदात गेला. एरवी नातेवाइकांअभावी डोळ्यात मायेची आस धरून राहणाºया, रोखून वाट पाहणाºया अनाथ मुलांना रविवारी उच्चभ्रू समाजातील बहिणींनी राख्या बांधून मायेचा मोठा ओलावा दाखवून दिला. हातात हा पवित्र धागा बांधताना त्या निरागस मुलांच्या चेहºयावरील स्मित हास्य पाहून बहिणींनाही गहिवरून आले. आळंदी, वडगाव, घेनंद, केंदूर, चाकण, रासे, भोसे, पिंपरी, चिंचवड, निघोजे, मरकळ, चिंबळी आदी गावांमधील तरुणांचा व्हॉट्सअ‍ॅपवर ‘जय हरी’ ग्रुप आहे. सामाजिक बांधिलकीतून विविध सामाजिक उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीरीत्या ते राबवितात. ग्रुपमधील महिला सदस्यांनी सलग चौथ्या वर्षी रक्षाबंधनाचा पवित्र सण अनाथ आश्रमातील ५० विशेष मुलांसमवेत साजरा करून इतरांसमोर एक चांगला आदर्श घालून दिला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी निकिता शिंदे, अनिता बर्गे, अश्विनी भुमकर, सोनाली गव्हाणे, स्नेहा बर्गे, स्वरा बवले, समृद्धी गव्हाणे, सीताराम बवले, संदीप बर्गे, स्वप्निल भुमकर, नवनाथ बवले, सनी नितनवरे, संतोष गव्हाणे हे फाउंडेशनचे सभासद उपस्थित होते.शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील संपर्क अनाथाश्रमातील मुलांना रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जय हरी ग्रुपच्या वतीने गोड जेवण देण्यात आले. त्यामुळे बहिणींनी हातात राख्या बांधून व भावांनी तोंड गोड करून आश्रमातील या विशेष मुलांना आनंद देण्याचा दुहेरी प्रयत्न केला आहे.

टॅग्स :PuneपुणेRaksha Bandhanरक्षाबंधन