शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यात १०७ कोटींचा मिळकतकर थकबाकी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 21:15 IST

थकबाकी दारांच्या मिळकतीसमोर बँड वाजवणे, मिळकती जप्त करणे, मिळकतींना सील ठोकणे आदी विविध स्वरुपाची कारवाई सुरु आहेत. थकबाकी वसूलीसाठी सर्व परिमंडळासाठी स्वतंत्र वसूली पथकांची नियुक्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहापालिका प्रशासनाकडे अखेरच पंधरा दिवस १ जानेवारी ते २८ फेबुवारी २०१८ या दोन महिन्यांच्या कालावधीत १०७ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात प्रशासनाला यश नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावातील १८ हजार १८५ मिळकतधारकांंनी ९ कोटी २६ लाख रुपयांचा मिळकत कर जमा

पुणे: महापालिका प्रशासनाकडे जास्तीत जास्त मिळकत कर वसूल करण्यासाठी आता अखेरचे पंधर दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे थकबाकीदारांच्या मिळकतीसमोर बँड वाजवणे, मिळकती जप्त करणे, मिळकतींना सील ठोकणे अशा विविध प्रकारच्या कारवायांना वेग आला आहे. यामुळेच गेल्या दोन महिन्यात तब्बल १०७ कोटी रुपयांची कर वसूली केली आहे. नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधून आतापर्यंत ९ कोटी २६ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे.     नोटबंदीमुळे जुन्या नोटा संपविण्यासाठी गतवर्षी शहरातील हजारो थकबाकीदारांनी लाखो रुपयांची थकबाकी भरून टाकली. यामुळे गत वर्षी मिळकत करातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळाले. महापालिकेच्या एकूण उत्पन्नामध्ये मिळकत कर हा उत्पन्ना प्रमुख स्त्रोत मानला जातो. यामुळे सन २०१७-१८ या वर्षांसाठी महापालिकेला मिळकत करातून १ हजार ८१६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होत. परंतु,  आता अखेरचे पंधरा दिवस शिल्लक असताना केवळ ९९४ कोटी ४ लाख रुपयांचा मिळकतकर वसूल झाला आहे. थकबाकी दार करदात्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे अखेरच्या दिवसांत जास्ती जास्त कर वसूल करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यामध्ये थकबाकी वसूलीसाठी सर्व परिमंडळासाठी स्वतंत्र वसूली पथकांची नियुक्त करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून थकबाकी दारांच्या मिळकतीसमोर बँड वाजवणे, मिळकती जप्त करणे, मिळकतींना सील ठोकणे आदी विविध स्वरुपाची कारवाई सुरु आहेत.    महापालिका प्रशासनाकडून थकबाकी वसूलीची कारवाई अधिक कडक केल्याने १ जानेवारी ते २८ फेबुवारी २०१८ या दोन महिन्यांच्या कालावधीत १०७ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावातील १८ हजार १८५ मिळकतधारकांंनी ९ कोटी २६ लाख रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे. ---------------सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार कार्यालयसन २०१७-१८ या अर्थिक वर्षांतील मिळकत कर वसूल करण्याची अखेरचे पंधरा दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे जास्तीत जास्त थकबाकीदारांनी त्वरीत मिळकत कर जमा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यात नागरिकांच्या सोयीसाठी पंधरा दिवसातील सर्व सार्वाजनिक सुट्टीच्या दिवशी देखील महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील व सर्व क्षेत्रिय कार्यालयामधील कर आकारणी व संकलन विभागाचे कामकाज सुरु ठेवण्यात येणार आहे. यांची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहमहापालिका आयुक्त विलास कानडे यांनी केले आहे.

 

टॅग्स :PuneपुणेTaxकर