शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशासाठी आज अखेरचा दिवस, सव्वा लाख जागांसाठी दोन लाख अर्ज; लॉटरी पद्धतीने प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 02:56 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी दोन लाख अर्ज आले आहेत. राज्यभरातून १ लाख २६ हजार जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया पार पडत आहे. आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. त्यानंतर येत्या १२ व १३ मार्च रोजी आलेल्या सर्व अर्जांमधून लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित केले जातील.

पुणे - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी दोन लाख अर्ज आले आहेत. राज्यभरातून १ लाख २६ हजार जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया पार पडत आहे. आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. त्यानंतर येत्या १२ व १३ मार्च रोजी आलेल्या सर्व अर्जांमधून लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित केले जातील.आरटीई प्रवेशासाठीच्या पहिल्या फेरीचे आॅनलाइन अर्ज भरण्यास १० फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. पहिली तसेच शिशू वर्गाच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. अर्ज भरण्यासाठी सुरुवातीला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा ७ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली, त्याचा बुधवार हा अखेरचा दिवस आहे. आरटीईच्या राखीव कोट्यांतर्गत राज्यभरात ९ हजार शाळांमधून १ लाख २६ हजार जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी मंगळवारअखेरपर्यंत १ लाख ७५ हजार अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती प्राथमिक विभागाचे उपसंचालक शरद गोसावी यांनी दिली. संगणकाद्वारे लॉटरी काढून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी १३ मार्चपर्यंत जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली जाईल. त्यानंतर रिक्त झालेल्या जागांसाठी प्रवेशाची दुसरी फेरी राबविली जाईल. एकूण ३ ते ४ फेºया राबविल्या जाण्याची शक्यता आहे. ज्या पालकांना आरटीई प्रवेशासाठी पहिल्या फेरीत अर्ज करता आला नाही, त्यांना दुसºया फेरीत अर्ज करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.विद्यार्थ्यांच्या प्रवेश मिळण्यास उशीर होऊ नये, यासाठी जानेवारी महिन्यापासूनच ही प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र,इंग्रजी शाळांनी आरटीईप्रवेशासाठी नावनोंदणी करण्यास विलंब केल्याने ही प्रक्रिया पुढे ढकलावी लागली.प्रवेशाची यादी १३ मार्च पर्यंत जाहीर होणार1आरटीई प्रवेशासाठी १२ व  १३ मार्च रोजी लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी १३ मार्चपर्यंत जाहीर केली जाईल.2त्यानंतर त्या-त्या शाळेत जाऊन प्रवेश घेण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्रवेशाची दुसरी फेरी राबविली जाईल.3त्याचबरोबर पुढील फेºयांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच प्राथमिक शिक्षण विभागाकडून जाहीर केले जाणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीPuneपुणे