शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सौंदर्यासाठी लेझर उपचाराकडे मध्यमवर्गीय तरूणींचा कल; मात्र ‘या’चाही होतोय धोकादायक वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 15:40 IST

त्वचारोग तज्ज्ञांकडे जाऊन लेझर उपचार करून घेण्याकडे आता मध्यमवर्गीय तरूणींचाही कल वाढला असून, हे प्रमाण जवळपास ५० टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. 

ठळक मुद्देदुष्परिणामांची माहिती नसल्याने तज्ज्ञांनी तरूणींना दिला धोक्याचा इशारातज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करून घेणे आवश्यक : धनश्री भिडेनॉन सर्जरी फिलर थ्रेडलिफ्टला जास्त मागणी : भूषण पाटील

नम्रता फडणीसपुणे : ‘सुंदर’ दिसावं असं वाटणं, यात चूक काहीच नाही, ही खूपच नैसर्गिक गोष्ट आहे. परंतु हल्लीचा काळ हा सुंदर दिसण्यापेक्षाही ‘प्रेझेंटेबल’ दिसण्याचा अधिक आहे. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणासह हार्मोन्सचे असंतुलन आणि ‘पोलिस्टीक ओव्हरीज’च्या वाढत्या समस्येमुळे चेहऱ्यावर येणाऱ्या पिटिका, अनावश्यक केस, चेहरा काळवंडणे या गोष्टी तरूणींसाठी चिंतेचा विषय ठरू लागल्या आहेत. त्यामुळेच त्वचारोग तज्ज्ञांकडे जाऊन लेझर उपचार करून घेण्याकडे आता मध्यमवर्गीय तरूणींचाही कल वाढला असून, हे प्रमाण जवळपास ५० टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. यातच आजही गोर असणं म्हणजेच सुंदरता, हीच सौंदर्याची परिभाषा वाटत असल्याने गोरेपणासाठीही क्रीम आणि स्टिरॉईडची इंजेक्शन घेण्यावर तरूणींकडून भर दिला जात आहे, परंतु त्याच्या दुष्परिणामांची माहिती नसल्याने तज्ज्ञांनी तरूणींना धोक्याचा इशारा दिला आहे.एक काळ असा होता सुंदरता ही पाहणाऱ्याच्या नजरेत दिसत होती.. लग्नाच्या बोहल्यावर चढल्यानंतरही तिचे नाकच ठुसके, तिचे ओठच ओबडधोबड, ती काय तर काळीच आहे अशा शब्द वल्गना होत नव्हत्या. तिला किंंवा त्याला आहे त्या रूपात स्वीकारणे आणि तनाच्या सुंदरतेपेक्षा मनाच्या सुंदरतेतून जोडीदाराची निवड करणे असा तो काहीसा मामला होता. मात्र काळानुरूप वृत्तवाहिन्यांचा पसारा वाढत गेला आणि जाहिराती-मालिकांमधून महिलांची ‘आकर्षक’अशी प्रतिमा समाजात तयार केली गेली. दुर्दैवाने तरूणींच्या हृदयावरही सुंदरतेची हीच परिभाषा घट्टपणे कोरली गेली. आज याच आकर्षकतेच्या मृगजळामागे तरूणी धावत सुटल्या आहेत. माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, अनुष्का शर्मा या अभिनेत्रींनी जसे कॉस्मेटिक सर्जरीमधून आपले सौंदर्य खुलवले त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत नाक, ओठ, चेहरा यांची कॉस्मेटिक सर्जरी करण्याकडे तरूणींचा कल वाढला आहे. यातच अनेक तरूणी किंवा महिला गोरे दिसण्यासाठी काही मलम आणि स्टेरॉईडचा वापर करताना दिसत आहेत, जे आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. मात्र तरूणी आणि महिलांमध्ये याबाबत जागृतीचा अभाव आहे. तरी याचा वापर करणा-या तरूणींनी गोरेपणासाठी कोणत्याही मलमांचा वापर करू नये किंवा उपचार घेऊ नये अन्यथा त्याच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा त्वचा रोग तज्ज्ञांनी दिला आहे. 

आपल्या सौंदयाबाबत आता तरूणी आणि महिला खूपच जागरूक झाल्या आहेत.सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तरूणींमध्ये हार्मोन्सचे असंतुलन, लठ्ठपणा तसेच पोलिस्टिक ओव्हरीच्या वाढत्या समस्येंंमुळे सौंदर्यात बाधा ठरणाऱ्या अनेक तक्रारींचा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यासाठी मध्यमवर्गीय तरूणींबरोबरच मॅनोपॉज आलेल्या महिलांचे चेहरा, केस यांच्यावर  लेझर उपचार करून घेण्याचे प्रमाण जवळपास ५०  ते ६० टक्के इतके  आहे. मात्र तरूणींनी चेहऱ्याशी निगडित कोणत्याही अवयवांवर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करून घेणे आवश्यक आहे. तरच ते आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरणारे आहे.-डॉ. धनश्री भिडे, त्वचारोग तज्ज्ञ

गेल्या दोन वर्षांमध्ये सुंदरतेपेक्षाही ‘प्रेझेंटेबल’ दिसण्याकडे मुलींचा कल वाढत चालला आहे. अगदी थ्रेड लिफ्ट, फेसलिफ्ट, नोज रिशेपिंग, लिप्स रिडकशन असे  उपचार करून घेण्याचे  प्रमाण अधिक आहे. यामध्ये विशेषत; नॉन सर्जरी फिलर थ्रेडलिफ्टला जास्त  मागणी आहे. या उपचारपद्धती सर्जिकल आणि नॉन सर्जिकल अशा दोन प्रकारामध्ये केल्या जातात.- डॉ. भूषण पाटील, एमसी-एच कॉस्मेटिक सर्जन

टॅग्स :Puneपुणे