शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

भाषा समाजाला जोडते : राज्यपाल सी. विद्यासागर राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 6:30 PM

भारतीय व्यवहार कोशामध्ये १६ भारतीय भाषांमधील ४० हजार शब्दांची माहिती आहे.

ठळक मुद्देदेशातील विविध भागात सहा वर्षे प्रवासातून कोश साकार

पुणे : भारतामध्ये विविध भाषा आणि संस्कृती अनेक वर्षांपासून एकत्र नांदत आहेत. भाषा ही समाजाला जोडण्याचे काम करते. त्यामुळे देशातील सोळा भाषांतील चाळीस हजारांहून अधिक शब्द असलेला भारतीय व्यवहार कोश देशी भाषांचे ज्ञान मिळविण्यासाठी उपयोगी ठरेल, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे व्यक्त केले.भारतीय विचार साधना, पुणे निर्मित तसेच दिवंगत विश्वनाथ नरवणे यांनी संपादित केलेल्या भारतीय व्यवहार कोषाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल राव यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी ते बोलत होते. भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष किशोर शशितल, सचिव राजन ढवळीकर, डेक्कन अभिमत विद्यापीठाचे उपकुलगुरु प्रसाद जोशी, हरिभाऊ मिरासदार या वेळी उपस्थित होते.राज्यपाल राव म्हणाले, भारतीय व्यवहार कोशामध्ये १६ भारतीय भाषांमधील ४० हजार शब्दांची माहिती आहे. यातील कोणत्याही भाषेतील व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी हा कोश उपयोगी पडेल. कोशाची तिसरी आवृत्ती प्रकाशित करणे म्हणजेच संपादक नरवणे यांना अभिवादन करण्यासारखे आहे. कारण, त्यांनी सहा वर्षे देशातील विविध भागात प्रवास करीत कोश साकारला. त्यानंतर त्यांनी अनेक भाषा तज्ज्ञांची भेट घेऊन कोश परिपूर्ण बनवला. नरवणे यांच्या पत्नी कविता नरवणे यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला. किशोर शशितल यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद जोशी यांनी पुस्तक परिचय करुन दिला. राजन ढवळीकर यांनी आभार मानले. राजेंद्र संगवी, दिगंबर घाटपांडे, शरद घाटपांडे, शरद थिटे, अस्मिता आसाट या वेळी उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणे