शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुढील सहा महिन्यांत रिंगरोडसाठी ' मिशन मोडवर ' भूसंपादन : जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 09:03 IST

पहिल्या टप्प्यात भोर तालुक्यातील कळवडे ते मावळ तालुक्यातील उर्से हा या 68 किलोमीटर लांबीचा पश्‍चिम रिंगरोड विकसित होणार आहे..

ठळक मुद्देजिल्हाधिकारी घेणार दर आठवड्याला आढावा; पहिल्या टप्प्यात 68 किलोमीटरसाठी भूसंपादन गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या रिंगरोडच्या कामाला आता प्रत्यक्षात सुरूवात होणार

पुणे :  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) रिंगरोडसाठी नुकतीच राज्य शासनाने अधिसूचना जाहीर केली आहे. यामुळे आता पहिल्या टप्प्यात भोर तालुक्यातील कळवडे ते मावळ तालुक्यातील उर्से हा या 68 किलोमीटर लांबीचा पश्‍चिम रिंगरोड विकसित होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या रिंगरोडसाठी पुढील सहा महिन्यांत मिशन मोडवर भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी आता दर आठवड्याला बैठक घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी सांगितले. 

गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या रिंगरोडच्या कामाला आता प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसीने रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच या रिंगरोडला राज्य सरकारकडून “विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा देखील देण्यात आला आहे.  तसेच हा रिंगरोड करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून राज्य शासनाने एमएसआरडीसीची नियुक्ती केली आहे. रस्त्यासाठी भूसंपादनासाठीचा निधी राज्य सरकारच्या मदतीने उभारता येणार आहे. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी यापूर्वी चार पर्याय निवडण्यात आले होते. मात्र, हे सर्व पर्याय बाजूला ठेऊन थेट खरेदीने भूसंपादन करण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. या रिंगरोडच्या भूसंपादनासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले आहेत. या अधिका-यांची आता दर आठवड्याला आढावा घेऊन भूसंपादनाच्या कामाला गती देणार असल्याची माहिती डाॅ.राजेश देशमुख यांनी दिली. ------असा होणार रिंगरोड रोड -  पहिल्या टप्प्यात रिंगरोडची लांबी 68 किलोमीटर-  केळवडे (ता.भोर) पासून उर्से (ता. मावळ) पर्यंत - रिंगरोड सहा पदरी आणि 8 बोगदे– खडकवासला बॅकवॉटरवरून मोठा पूल– एकूण छोटे पूल – 3, उड्डाणपूल – 2– रिंगरोडवरून प्रतिदिन 60 हजार वाहने धावतील– न्यू मार्गावर जाण्यासाठी सहा ठिकाणी इंटरचेंज– रिंगरोडसाठी सुमारे 750 हेक्‍टर जागेची आवश्‍यकता– प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 10 हजार कोटी रुपये--------या गावांमध्ये होणार भूसंपादन पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से (ता. मावळ) येथून सुरुवात परंदवाडी-धामणे- बेबडओहोळ-चांदखेड-पाचाणे (ता.मावळ) – पिंपळोली- केमसेवाडी -जवळ- पडळघरवाडी- रिहे – मातेरेवाडी – घोटावडे – अंबडवेट- भरे – कासारआंबोली – उरावडे – आंबेगाव – मारणेवाडी – मोरेवाडी – भरेकरवाडी – कातवडी (ता. मुळशी) – बहुली- भगतवाडी -सांगरुण – मांडवी बुद्रुक – मालखेड – वरदाडे – खामगाव मावळ – घेरा सिंहगड – मोरदरवाडी – कल्याण – रहाटावडे (ता. हवेली) – रांजे- कुसगाव -खोपी- कांजळे- केळवडे (ता. भोर) येथील पुणे -सातारा

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारी