शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

Pune: लालपरी घडविणार भाविकांची अयोध्या यात्रा; २४ एप्रिलला धावणार पहिली गाडी

By अजित घस्ते | Updated: March 18, 2024 18:18 IST

प्रभू रामाच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांची संख्या वाढत आहे...

पुणे : नुकतेच अयोध्येत प्रभू रामाचे प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आले. यानंतर सर्वसामान्य भक्तांसाठी हे मंदिर खुले करण्यात आले. प्रभू रामाच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांची संख्या वाढत आहे. रेल्वेने विशेषतः स्पेशल आस्था रेल्वे सुरू केली आहे. त्याचं धरतीवर एसटी महामंडळाने पुढाकार घेतला असून, अयोध्येला जाण्यासाठी सरासरी ४५ ते ५५ जणांच्या भाविकांचा ग्रुप असेल तर एक बस सोडण्यात येणार आहे. यामुळे भाविकाना प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेता येणार आहे.  अयोध्येत बांधलेल्या राममंदिराविषयी जगभरातील भाविकांत कुतूहल निर्माण झाली आहे. राम मंदिर दर्शनासाठी अनेक राज्यातून रेल्वे सोडण्यात येत आहे. दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी राजकीय पक्ष, नेतेही आयोध्या यात्रेचे नियोजन करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून गेल्या महिन्याभरात रोज किमान दहा रेल्वे गाड्या अयोध्या मार्गावर हाऊसफुल्ल धावत आहेत. पाठोपाठ एसटी महामंडळाने अयोध्येला जाण्यासाठी एसटी देण्याची सोय केली आहे. राज्यातून धुळे जिल्ह्यातून पहिली बस दर्शनासाठी सोडण्यात आली होती. त्याच धर्तीवर पुणे जिल्ह्यातून मागणीनुसार बसेस सोडल्या जातील. जर भाविकांचा ५० जणांचा ग्रुप असेल तर त्यांच्या मागणीनुसार आणि सोयीनुसार पाहिजे ती गाडी देण्यात येणार आहे.

५६ रुपये प्रतिकिलोमीटर भाडे...अयोध्यासाठी जाणार्‍या भाविकांसाठी प्रतिकिलोमीटर ५६ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. त्यासाठी  ५० भाविकांनी एकत्र येऊन ग्रूप तयार करावा लागेल. या प्रवासासाठी चांगल्या गाड्या देण्यात येतील. तसेच सोबत दोन चालक असतील. या यात्रेदरम्यान तीन-चार मुक्काम होतील. आरामदायी प्रवासासाठी शिवशाही तर ज्यांना स्वस्तात प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी मागणीप्रमाणे साधी लालपरी बसही देण्यात येईल.

परमिट काढून प्रवास...एसटी महामंडळाचा राज्यात व परराज्याशी प्रवासी वाहतुकीचा करार असलेल्या राज्यात एसटीची प्रवासी वाहतूक करताना परमिट काढण्याची गरज नाही. त्यामुळे अयाध्येला जाताना मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या दोन राज्यांतील वाहतूक परमिट काढावा लागतो. त्यामचे भाड्याच्या स्वरुपात प्रवाशांकडून घेतले जाईल.

पंढरपूर वारी, गणेशोत्सव अशा यात्रा-जत्राच्या काळात भाविकांना करारानुसार बस देण्यात येते. त्याच धर्तीवर एसटी महामंडळने अयोध्येला एकत्रित जाणार्‍यांसाठी बस सुविधा सुरू केली आहे. त्यासाठी किमान ४५ ते ५५ प्रवासी असावेत. स्थानिक आगारात संपर्क केल्यावर बस उपलब्ध होईल.- प्रमोद नेहुर, पुणे विभाग नियंत्रक

टॅग्स :Ayodhyaअयोध्याPuneपुणे