शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लाखोे वारकर्‍यांच्या दिंड्या आळंदीत दाखल; अलंकापुरी न्हाऊन निघाली भक्तीरसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 14:01 IST

संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या ७२२ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी अलंकापुरीत वैष्णवांचा मेळा भरला आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून विविध ठिकाणांहून पायीवारी करीत येत असलेल्या असंख्य भाविकांच्या दिंड्या आळंदीत स्थिरावत आहेत.

ठळक मुद्देश्री ज्ञानोबारायांच्या ७२२ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी अलंकापुरीत भरला वैष्णवांचा मेळा सुरक्षा यंत्रातूनच भाविकांना मंदिरात प्रवेश

आळंदी : आळंदीची वारी आहे माझे घरी!आणिक न करि तीर्थव्रत !!      या ओवीप्रमाणे ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या ७२२ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी अलंकापुरीत वैष्णवांचा मेळा भरला आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून विविध ठिकाणांहून पायीवारी करीत येत असलेल्या असंख्य भाविकांच्या दिंड्या; तसेच पालख्या प्रदक्षिणा पूर्ण करून आळंदीत स्थिरावत आहेत. त्यानंतर भाविक दर्शन रांगेतून अगदी सुलभ पद्धतीने ‘श्रीं’च्या समाधीचे दर्शन घेत आहेत. सुरक्षा यंत्रातूनच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे.ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधीचा हा आनंददायी सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवण्यासाठी राज्यभरातून वारकरी दिंडी, पालखीसह टाळ-मृदंगांच्या गजरात ‘ज्ञानोबा -माऊलीं’चा जयघोष करीत अलंकापुरीत मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे पवित्र इंद्रायणीकाठ भाविकांनी गजबजून निघाला आहे. भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ आदी कार्यक्रमांमध्ये वारकरी व भाविक दंग होऊन संजीवन सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. आज (दि.१२) दिवसभरात वडगाव रोड, मरकळ रोड, चाकण रोड, भोसरी मार्ग आदी ठिकाणांहून वारकर्‍यांच्या पायी दिंड्यांनी अलंकापुरीत प्रवेश केला. आळंदीत दाखल झाल्यानंतर ‘पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव-तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ असा जयघोष प्रत्येक वारकर्‍यांकडून केला जात आहे. मंगळवारी (दि.१४) कार्तिकी एकादशी असल्याने एकादशीची संपूर्ण जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, आळंदीत टाळ-मृदंगांचा गजर सुरू आहे. पवित्र इंद्रायणीतीरी व मंदिराच्या वीणामंडपात महिला वारकरी फेर, फुगड्या, भारूडे सादर करून आनंद घेत होते. देहभान विसरून वारकरी सोहळ्याचा अनुभव घेत आहेत. अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघत आहे.

टॅग्स :Puneपुणे