शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा फुलेंच्या मुळ गावी बांधली जाणार मोठी शाळा- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 13:57 IST

प्रियांका गांधीच्या अटकेवर बोलताना सुप्रिया ताई म्हणाल्या, पवार साहेब यावरही बोलले आहेत. हीच पक्षाची भूमिका आहे

पुणे: देशात मुलींसाठी पहिला शाळा सुरू झाली ती पुण्यामध्ये. ही शाळा सुरू करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर मात करत महात्मा फुलेंनी 1848 रोजी मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाली. आजही अनेक भागातील मुलींना शिक्षणापासून दूर रहावे लागत आहे. मात्र आता महात्मा फुले (mahatma jyotiba phule) यांचं मुळ गाव असणाऱ्या खानवडीत मुलींची मोठी शाळा बांधली जाणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी पुण्यात दिली.

याठिकाणी महात्मा फुलेंचं स्मारकही होईल. तसेच सातारा, खानवडी आणि पुणे अशा तीनही ठिकाणी मुलींच्या शाळा बांधण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहितीही खासदार सुळे यांनी दिली. तसेच राज्यातील ऐतिहासिक ठिकाणांचा विकास आणि डागडुजीवरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

'लखीमपूर प्रकरण सहन केले जाणार नाही'-

लखीमपूर हत्याकांडासारखी प्रकरणे आम्ही कधीच सहन करणार नाही. असा कुठलाही अन्याय कोणत्या महिलेवर आणि शेतकऱ्यांवर होणार असेल तर कोणाचीही सत्ता असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस कधीच सहन करणार नाही. तिथे लोक शांततेच्या मार्गानेच आंदोलन करत होते. त्यांच्यावर झालेला हल्ला उत्तर प्रदेश सरकारनेच केला आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीची भूमिका पवारांनी काल दिल्लीत मांडली असल्याची माहितीही खासदार सुळे यांनी दिली.

प्रियांका गांधीच्या अटकेवर बोलताना सुप्रिया ताई म्हणाल्या, पवार साहेब यावरही बोलले आहेत. हीच पक्षाची भूमिका आहे. आम्ही खंबीरपणे कुठल्याही अन्यायाच्या विरोधात उभे राहणार. प्रियांकाजी, बघेलजी यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहू. प्रियांका गांधी यांच्या अकटेनंतर देशात अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चे काढले होते. 

लखीमपुरमध्ये एवढं सगळं होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणावर काहीच न बोलल्याचे आश्चर्य वाटते. ते कधीच अशा प्रकरणांवर बोलत नाहीत. गेल्या महिनाभरात बलात्कार घटना झाल्या तेव्हाही गप्प होते, आताही ते काही बोलले नसल्याचे, खासदार सुळे म्हणाल्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेPuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदी