शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते सुरक्षेच्या प्रबोधनासाठी निधीची पडतेय कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 04:47 IST

दरवर्षी रस्ता सुरक्षेचा जागर करण्यासाठी परिवहन विभाग, वाहतूक पोलीस तसेच इतर विभागांवर शासनाकडून भार टाकला जातो. पण त्यासाठी या विभागांना स्वतंत्र निधी मिळत नाही.

- राजानंद मोरेपुणे : दरवर्षी रस्ता सुरक्षेचा जागर करण्यासाठी परिवहन विभाग, वाहतूक पोलीस तसेच इतर विभागांवर शासनाकडून भार टाकला जातो. पण त्यासाठी या विभागांना स्वतंत्र निधी मिळत नाही. त्यामुळे केवळ ठराविक दिवसांसाठीच सुरक्षेचा फार्स होतो. वर्षभर प्रबोधन करण्याची गरज असताना निधीअभावी शक्य होत नाही. त्यामुळे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने प्रबोधनासाठी स्वतंत्र सुरक्षा पथकाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे.केंद्र व राज्य शासनाकडून दरवर्षी पंधरा किंवा सात दिवसांचे रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलीस, एसटी महामंडळ तसेच वाहतुकीशी संबंधित सर्व विभागांसह शासनाचे इतर विभागही त्यांच्या पातळीवर हे उपक्रम राबवित असतात. यामध्ये आरटीओ आणि पोलिसांकडून वर्षभर विविध माध्यमातून प्रबोधनाचे काम केले जाते. पण त्यासाठी त्यांना स्वतंत्र निधी मिळत नाही. त्यामुळे प्रबोधनाला मर्यादा येत आहेत. उपलब्ध निधी व मनुष्यबळामध्येच काम करावे लागत आहे. वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रबोधनावर भर देण्याबाबत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या आॅगस्ट महिन्यात झालेल्या बैठकीमध्ये स्वतंत्र रस्ता सुरक्षापथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सुरक्षापथक निर्माण करण्यासाठी निधीची मागणी करणारा प्रस्ताव जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना नुकताच प्रस्ताव दिला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि बारामती उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत हे स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. समितीचे सचिव व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी परिवहन आयुक्तांकडे मागणी केली आहे. या पथकात एक वाहन, दोन मोटार वाहन निरीक्षक व एक सहायक पूर्णवेळ असतील. त्याचप्रमाणे प्रचार साहित्य, बॅनर्स, प्रोजेक्टर, लॅपटॉप आदी साधनसामुग्रीचीही मागणी करण्यात आली आहे.प्रबोधनासाठी प्रायोजक शोधावा लागतोवाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनीही काही महिन्यांपूर्वी प्रबोधनाच्या कामासाठी विविध साधनसामग्री मिळण्याबाबत जिल्हा समितीकडे मागणी केली. रस्ता सुरक्षा विभागामध्ये सध्या एक अधिकारी व १५ कर्मचारी आहेत. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन व प्रशिक्षणासाठी हे पथक कार्यरत असते. पुणे आवश्यक निधी व साधनसामग्री नसल्याने जनजागृती करण्यात अडचणी येतात. नेहमी प्रायोजक शोधावा लागतो. स्वतंत्र वाहन, प्रोजेक्टर, व्हिडीओ कॅमेरा, लॅपटॉप इतर उपकरणे मिळाल्यास ही अडचण दूर होईल, अशी अपेक्षा सातपुते यांनी समिती अध्यक्षांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.रस्ता सुरक्षेवर प्रबोधन करण्यासाठी आरटीओ, पोलिसांना निधी नसतो. सुरक्षा पथकाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत प्रबोधन होऊ शकते. रस्ता सुरक्षा निधीमध्ये २०० ते ३०० कोटी रुपये जमा आहेत. यातून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीला विविध कामांसाठी हा निधी देण्याची गरज आहे.- खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,अध्यक्ष, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती

टॅग्स :Puneपुणे