शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

"कोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊन से मरेंगे हम", माहिती फलके घेऊन व्यापाऱ्यांनी केले आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 12:36 IST

लक्ष्मी रस्त्यावर केली सहा फुटाच्या अंतराची मानवी साखळी

ठळक मुद्देराज्‍य सरकार आणि पुणे महापालिकेच्या निर्णयाविरोधात उठवला आवाज

कोरोना से मरेंगे कमी, लॉकडाऊन से मरेंगे हम अशी माहितीफलके  हातात घेऊन राज्‍य सरकार आणि पुणे महापालिकेच्या निर्णयाविरोधात पुणे व्यापारी महासंघाने लक्ष्मी रस्त्यावर आंदोलन केले.  

राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आज पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने काळ्या फितीहि लावण्यात आल्या. जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीज ते नाना पेठेतील क्वॉर्टर गेटपर्यंत सहा फुटांचे अंतर ठेवत साखळी करण्यात आली. यावेळी, व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाचा निषेध, मेरा पेट मेरी मजबुरी, दुकान खोलना है जरूरी आदी माहितीपर फलक झळकाविण्यात आले. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या आंदोलनात दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह व्यावसायिक सहभागी झाले होते.

राज्य सरकार व पुणे महापालिका प्रशासनाने नव्याने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊन नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयाविरोधात व्यापारी वर्गांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे व्यापारी महासंघातर्फे दोन दिवसीय तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. 

सर्व पुणे व्यापारी महासंघाशी संलग्नित शहरातील व्यापारी संघटना आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील किरकोळ व घाऊक अशी जवळपास ४० हजार दुकाने बंद आहेत. यामध्ये, शहरातील मध्यवर्ती भागाबरोबरच पेठांमधील सराफ, होजिअरी व कापड, ऑटोमोबाईल, प्लायवूड, टिंबर, स्टेनलेस स्टील, नॉन फेरस मेटल, पेपर, प्लास्टिक, इलेक्ट्रिक अ‍ॅन्ड इलेक्ट्रॉनिक, मशिनरी व वेल्डींग, कॉम्पुटर, टॉईज, वॉच, सायकल, केमिकल निगडीत व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या बाजारपेठांमधून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात साहित्य पाठविले जाते. बंदमुळे पुरवठा साखळी खंडीत झाली असून, सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. 

टॅग्स :Puneपुणेlakshmi roadलक्ष्मी रोडbusinessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार