शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Koregaon-Bhima Violence : माओवादी 'थिंक टँक' अटक,आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना 90 दिवसांची मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 13:13 IST

Koregaon-Bhima Violence : आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना कोर्टाकडून 90 दिवसांची मुदत वाढ मिळावी आहे.

पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांच्या विरोधात तपास करून आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची वाढ मिळावी, असा अर्ज पुणे पोलिसांनी शनिवारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यासठी आणखी 90 दिवसांचा कालावधी मिळणार आहे.  याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन यांच्या अटकेला 3 सप्टेंबरला 90 दिवस पूर्ण होत आहे. 90 दिवसांत त्यांचाविरोधात दोषारोपत्र दाखल न झाल्यास आरोपींना जामीन मिळू शकतो. त्यामुळे दोषारोपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची वाढ मिळावी, असा अर्ज करण्यात आला होता. 

दरम्यान पोलिसांच्या अर्जावर शनिवारीच दुपारी 4 वाजता सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यावी केली होती. मात्र बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. रोहन नहार आणि अ‍ॅड. राहुल देशमुख यांनी आरोपींना हा अर्ज अभ्यासण्यासाठी कालावधी मिळावा. त्यासाठी सुनावणी सोमवारी ठेवण्याची मागणी केली. परंतु त्यास अ‍ॅड. पवार यांनी विरोध करताना सोमवारी उच्च न्यायालयात या प्रकरणात सुनावणी असल्याने तपास अधिका-यांना उपस्थित राहणे शक्य होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे रविवारी सुनावणी ठेवण्यात आली होती,

अटक केलेले सर्वजण सीपीआय या बंदी घातलेल्या संघटनेचे सक्रीय सदस्य असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून कागदपत्रे, पेन ड्राईव्ह, सीडी, डीव्हीडी, हार्ड डिक्स, सिम कार्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्या तपासासाठी मुंबई फॉरेंसिक लॅबकडे तपासासाठी पाठवल्या आहेत. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देशात बेकायदा अ‍ॅक्टीव्हिटी करत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना नक्षली भागात नेवून प्रशिक्षण देत होते. त्यांच्या फेसबुक, ई-मेलचा तपास सुरू आहे, यासाठी दोषारोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ द्यावी, असे पोलिसांनी दिलेल्या अर्जात नमुद करण्यात आले आहे, 

शहरी नक्षलवाद हा जंगलातील नक्षलीपेक्षा गंभीर व व्यापक स्वरूपाचा आहे. आधीचे पाच आरोपी आणि नुकतेच अटक करण्यात आलेले तीन अशा एकूण आठ आरोपींकडून ताब्यात घेण्यात आलेला डेटा हा मोठ्या प्रमाणात असून त्या त्याचे विश्लेषण करण्याचे काम सुरू आहे. त्यातील काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसची क्लोन कॉफी देखील प्राप्त झाली आहे. आरोपींचे बँक खाते तपासण्यात येत असून त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मोबाइलद्वारे त्यांनी ज्या ज्या व्यक्तींशी संवाद साधले आहेत त्यातून काही माहिती उपलब्ध होत आहे का याचा तपास सुरू आहे, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केला.

(Koregaon Bhima Violence: कोरेगाव भीमा भडकवण्यासाठी नक्षलींनी दिले होते ५ लाख रुपये; पोलिसांकडे भक्कम पुरावा)

या प्रकरणातील तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी न्यायालयात सांगितले की, CRPP, CUDR, CDRO, APT, PUCL, LCC, अशा विविध ह्युमन राईट कमिटीच्या माध्यमांतून माओवादी संघटनाचे काम सुरू आहे. संघटनेमध्ये देशातील काही नामांकित संस्थेतील विद्यार्थी सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यांना नेमकी कोणी सहभागी केले, त्यांना कुठल्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे,  याचा तपास करायचा आहे, एल्गार परिषदेसाठी आलेले पाच लाख रुपये कशा प्रकारे खर्च झाले, कोणी खर्च केले याचा तपास करायचा आहे. पत्रांमध्ये उल्लेख असणारी शस्त्रे कोणी खरेदी केली , ती कोठून आणण्यात आली, त्यांचा वापर कुठे होणार होता, पैसे कोणी पुरवले आदी बाबींचा तपास करायचा आहे, अशी माहिती डॉक्टर पवार यांनी दिली.

दरम्यान बचाव पक्षाच्या वतीने अडवोकेट रोहन नहार, एडवोकेट सिद्धार्थ पाटील आणि एडवोकेट राहुल देशमुख यांनी युक्तिवाद केला. अटक करण्यात आल्यापासून आजतायगत 90 दिवस पूर्ण झालेले नाही. 4 सप्टेंबरला अटकेला 90 दिवस होत आहेत. त्यामुळे पोलिसांकडे अजून दोन दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे अॅफिडेव्हिट होण्यासाठी आम्हाला दोन दिवसांचा कालावधी मिळावा मागणी पाटील यांनी केली.

दरम्यान आरोपींना पुस्तके आणि कागदपत्रे देण्यात यावी असा आदेश यापूर्वी न्यायालयाने होता. मात्र जेल प्राशासनाने त्यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे आरोपींना पुस्तके व कागदपत्रे मिळावी असा अर्ज बचाव पक्षाकडून करण्यात आला आहे, त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

 

 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारnaxaliteनक्षलवादी