शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा दंगल; चौकशीला तयार असल्याची पत्रे पोलिसांना पाठविली - मिलिंद एकबोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 06:32 IST

सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर मिलिंद एकबोटे यांनी ग्रामीण पोलिसांना चार पत्रे पाठवून आपण चौकशीला तयार असल्याचे कळविले होते़

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर मिलिंद एकबोटे यांनी ग्रामीण पोलिसांना चार पत्रे पाठवून आपण चौकशीला तयार असल्याचे कळविले होते़ परंतु, ग्रामीण पोलिसांनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही किंवा त्यांना चौकशीलाही बोलविले नाही, असे मिलिंद एकबोटे यांचे वकील महिन प्रधान यांनी सांगितले़ कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती़ तेथेही अर्ज फेटाळला गेल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले़ सर्वोच्च न्यायालयाने ७ फेब्रुवारीला त्यांना अंतरिम जामीन मंजूर करून त्याची सुनावणी २० फेब्रुवारी रोजी ठेवली होती़ मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अंतिम सुनावणी ४ मार्चला ठेवली असून तोपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे़याबाबत ज्येष्ठ वकील महिन प्रधान यांनी सांगितले, की ७ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिल्यानंतर १२, १३, १४ व १६ फेब्रुवारी रोजी मिलिंद एकबोटे यांनी ग्रामीण पोलिसांना पत्र पाठवून आपण कोणत्याही चौकशीला तयार आहे़ १ जानेवारी रोजी आपण पुण्यातील आपल्या घरीच होतो़ हे आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून खात्री करून शकता़ याशिवाय पुणे पोलिसांनी मला २४ तास पोलीस संरक्षण दिले आहे़ त्यांच्याकडे चौकशी करू शकता, असे त्या पत्रात म्हटले आहे़ याशिवाय त्यांनी फोन, मेसेज करून आपण चौकशीला तयार असल्याचे कळविले होते़अ‍ॅड़ प्रधान यांनी सांगितले, की मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या अर्जावर सुनावणी झाली तेव्हा न्यायमूर्तींनी पोलिसांना विचारले,की तुम्ही त्यांना चौकशीला का बोलावले नाही़ त्यावर राज्य शासनाच्या वतीने वकिलांनी सांगितले की, आम्हाला त्यांना अटक करून पोलीस कोठडी हवी आहे़ त्यावर न्यायालयाने आम्ही अटक करण्याची आॅर्डर दिली आहे़ अटक केल्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्याचे आदेशात म्हटले आहे़ यावर त्यांच्या वकिलांनी आम्हाला पोलीस कोठडी हवी असल्याचे सांगितले़ तेव्हा न्यायालयाने तुम्ही तपास सोडून कोठडीत घेण्याचे कारण काय?़ तुम्ही तपासावर लक्ष द्या, असे सांगितले़

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMilind Ekboteमिलिंद एकबोटे