शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
2
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
3
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
4
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
5
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
6
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
7
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
8
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
10
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
11
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
12
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
13
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
14
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
15
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
16
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
17
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
18
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
19
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे बिघडलं कोकणच्या राजाचं गणित; आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत

By अजित घस्ते | Updated: April 15, 2023 17:07 IST

आंबा उत्पादनात ४० टक्के घट : सध्या बाजारात ३० टक्केच आंबा शिल्लक

पुणे : 'कोकणचा राजा' अशी ओळख असलेल्या आणि जगभराला भुरळ घातलेल्या हापूस आंब्याच्या हंगामाचं गणित यंदा बिघडलं आहे. थ्रीप्स रोगाचा प्रचंड प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस आणि उष्ण वातावरण यामुळे नेहमीच्या तुलनेत हापूसचे उत्पादन केवळ तीस ते चाळीस टक्केच सध्या शिल्लक आहे. अक्षय तृतीय निमित्ताने पुणे, मुंबईसह इतर बाजारपेठांत मोठया प्रमाणात रत्नागिरी, देवगड हापूस आंब्याची मागणी असते. मात्र बाजारात आंब्याचा तुटवडा निर्माण झाल्याने काहीसे भाव वाढले आहेत. सध्या किरकोळ बाजारात एक डझन आंब्याची विक्री ६०० रुपयांपासून १२०० रुपयांपर्यंत विक्री केली जात असल्याने यंदा आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतिच्या आंब्याची चव अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आंब्याची चव चाखता  येणे अवघड झाले आहे.

साधारण ऑक्टोबर महिन्यात आंब्याच्या झाडांना मोहोर लागण्यास सुरुवात होते. त्यानंतर पुन्हा मोहोर लागण्याची प्रक्रिया काहीकाळ थांबून डिसेंबर ते जानेवारी कालावधीत मोहोर लागतो. ऑक्टोबरच्या मोहराला अवकाळीचा फारसा फटका बसला नाही. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील डिसेंबर, जानेवारीमध्ये येणाऱ्या मोहोरला थ्रीप्सचा मोठा फटका बसला. त्यातच काही प्रमाणात उष्णता आणि अवकाळीमुळेही आंबा कमी झाला. परिणामी यंदा उत्पादन तीस ते चाळीस टक्के सापडले असून, हंगामही लवकर संपेल. यामुळे बाजारात आंब्याला चांगला भाव मिळाला तरी उत्पादनच कमी झाल्याने आंब्याचा तुटवडा जाणवत आहे.हापूसचे प्रतवारीनुसार  घाऊक बाजारातील भाव

कच्चे     ४ ते ९ डझन - २५०० ते ४००० रुपये

तयार    ४ ते ९ डझन -३०००  ते ५५०० रुपये

किरकोळ  बाजार एक डझन दर : ६०० ते १२०० रूपये

आंब्यावर थ्रीप्सचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. झाडावर कैरीत आलेला आंब्याची गळती झाली. रोग आणि उष्णतेने काही आंब्यावर डाग पडले. परिणामी उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कामगारांचा पगार , बिया, बांगाची देखरेख करणे कठीण होत आहे. बाजारात आंब्याला चांगला भाव मिळत असला  तरी उत्पादनच कमी झाल्याने आंब्याच्या पेढया निर्यात करणे शक्य नाही.- मकरंद काणे , आंबा उत्पादक गणपतपुळे रत्नागिरी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMangoआंबा