शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोंढवा बुद्रुक काकडेगल्ली : सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 02:57 IST

कोंढवा बुद्रुक येथे घरात असलेल्या सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाली असून, यात राहणाऱ्या लोकांच्या संसाराचा पूर्णपणे कोळसा झाला आहे.

कोंढवा  - कोंढवा बुद्रुक येथे घरात असलेल्या सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाली असून, यात राहणाऱ्या लोकांच्या संसाराचा पूर्णपणे कोळसा झाला आहे. या लोकांना राहायला छत राहिले नाही की रोजच्या संसारोपयोगी वस्तू जळल्या असल्याने जगण्यासाठी पुन्हा नव्याने जुळवाजुळव करावी लागणार आहे.कोंढवा बुद्रुक येथील काकडे वस्तीमधील गल्ली नंबर ३ येथे शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास वाघमारे यांच्या घराच्या दुसºया मजल्यावर असलेल्या पत्राच्या खोल्यांमध्ये ही घटना घडली. २.३० च्या सुमारास अचानक सिलिंडरचा स्फोट झाल्याचा आवाज आजूबाजूला राहणाºया लोकांना ऐकू आला. वाघमारे यांच्या घराच्या दुसºया मजल्यावर तीनपत्र्याच्या खोल्या असून यात भाडेकरू राहत होते.घरातील वस्तू सर्वत्र फेकल्या गेल्या. या वेळी या घरात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. कोंढवा बुद्रुक व खुर्द या अग्निशमन दलाच्या, तसेच मुख्य अग्निशमन दलाच्या एका गाडीने या आगीवर त्वरित नियंत्रण मिळविले. गल्लीत असलेले अरुंद रस्ते व रस्त्याच्या सुरू असलेल्या कामांमुळे घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागली. एका खोलीत राहत असलेल्या ललिता परमेश्वर बनसोडे यांच्या घरातील बंद कपाटात असलेले सोन्याचे दागिने सहीसलामत मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. तांडेल सुभाष जाधव, अजय बेलोसे, संग्राम देशमुख, ताठे, रवी बारटक्के, राजाराम केदारी, मंगेश मिळवणे, शफीक सय्यद, आकाश पवार, विशाल यादव या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवली.कोणत्या तरी एका खोलीत सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट कोणत्या कारणास्तव झाला याचे कारण कळू शकले नाही.या खोलीचे पत्रे स्फोटामुळे उंच उडाले व घरातील साहित्याला आग लागली.बघता बघता आग शेजारी असलेल्या इतर खोल्यांमध्ये पसरली व या खोल्यांमध्ये असलेले दोन सिलिंडर एका मागोमाग फुटले. ज्यामुळे या तिन्ही खोल्यांमध्ये असलेले संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.

टॅग्स :Puneपुणे