शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राच्या शीतल चांदण्यात शब्दसुमनांची बरसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 22:04 IST

‘हास्यमैफल’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध हास्यकवी बण्डा जोशी तसेच विविध कवी संमेलन गाजविलेले. अनिल दीक्षित आणि भालचंद्र कोळपकर यांनी या मैफलीमध्ये सहभाग घेतला.

पुणे :      मोबाईल नेटने युग नवं आणलं     आली मैना पुढं तिने दु:खच मांडलं      लागल्यात जुन्या पोपटांना मिरच्या झोंबायला      जेव्हा धाडस करून मैना मीटू मीटू बोलायला      शुटींग करताना ’तनु’ला त्यांनी      हैराण केले ’नाना’ तऱ्हांनी       लागली त्यांची तनुश्री दत्तापायी  पाप फेडायलातनुश्री दत्ता ने  ‘मीटू’ च्या माध्यमातून नाना पाटेकरांच्या कृत्यावर आवाज उठविल्यानंतर समाजात सर्वत्र  ‘मी टू’ चे वादळ घोंघावू लागले आहे,त्यावर मार्मिक भाष्य करणा-या या या कवितेसह नोटाबंदी, पेट्रोल दरवाढ अशा विडंबनात्मक आणि प्रहसनात्मक कवितांच्या एकेक फुलो-यातून  कवितेचा गुलदस्ता उलगडला. शीतल चंद्राच्या प्रकाशात शब्दसुमनांच्या बरसातीतून ही काव्यमैफल सजली.निमित्त होते, ‘लोकमत’तर्फे कोजागरी पोर्णिमेच्या पूर्वरात्री आयोजित काव्यमैफलीचे.  ‘हास्यमैफल’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरातपोहोचलेले प्रसिद्ध हास्यकवी बण्डा जोशी तसेच विविध कवी संमेलन गाजविलेले. अनिल दीक्षित आणि भालचंद्र कोळपकर यांनी या मैफलीमध्ये सहभाग घेतला.शब्दांचे विविध रंग खुलवत त्यांनी दोन तास मैफली जागवली.      शब्द माझे सूर तुझे     गीत मी गाऊ का?     हात माझे गाल तुझे     कानाखाली देऊ का?या विनोदात्मक कवितेमधून बण्डा जोशी यांनी मैफलीत पहिल्याच बॉलला सिक्सर मारला. मुली किती कडक होत्या? हे दर्शविणा-या याकवितांनी हसूनहसून पुरेवाट केली.’ बाबा कालचीच रात,येत होते मी मुकाट  आला आडवा हारस्त्यात मेला वाट सोडेना  मवाली हा झाला होता असा वेडापिसा  हात धरला असा कळ जाईनाआले धकलून धावतपळत घरी आलेयाची खोड मोडा याचे वाजवा की बारागल्लीतून जात असताना छेड काढलेल्या एका मुलीने बाबांकडे तक्रार केली आणि वडिलांना घेऊन आली ते तिने शब्दातून कसे कथन केले हे  ‘आता वाजले की बारा’ या गीताच्या चालीत त्यांनी  विडंबनात्मक कविता सादर केली.बापाने त्या पोराची बेदम धुलाई केल्यानंतर पोराच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडले ’अहो अस काय करता बदाबदा मारता सुजली पाठ माझी’...हे सादर करतानाउपस्थितांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर खास सैगलच्या आवाजात  ‘जब सर ही तुट गया हम जीके क्या करे? या प्रहसनात्मक कवितेने रंजकता आणली.

उरात होते धडपड बंदी नोटांवर आलीहजार पाचशे नोटा बदलून घ्या आज्ञा मोंदीची झालीआधी अधीर झालो या बधिर झालोयाअन ब्लँक मनी व्हाईट करता जेरीस आलोया

अन उरतोय भुंगाट  पळतोय चिंगाट अंगलट आलयाअवैध मार्गाने पैसा कमावणा-यांची मोदींनी  ‘नोटाबंदी’ करून कशी वाट लावली ही विडंबनात्मक कविता  ‘झिंगाट’ स्टाईलमध्ये कवी अनिल दीक्षित यांनी सादरकरून वातावरणात चांगलीच रंगत आणली. ‘ पेट्रोल-डिझेल दरवाढीने चांगलाच धूर काढला, हात कसा लावू आता गाडीला,प्रेयसीला म्हटल कसं फिरवू ग, पेट्रोल परवडेना कसं फिरवू ग....त्यावर तिने पेट्रोलपंपवाला गटवला आणि मला मेमो धाडिला....असे सांगताचउपस्थितांमध्ये हशा पिकला. नवरा बायको च्या प्रेमावर आणि भांडणावरच भालचंद्र कोळपेकर यांनी थेट बोट ठेवले.नवरा म्हणाला बायकोला               तू परीसारखी दिसतेस              त्यावर ती म्हणाली              अहो, एवढी घ्यायची नसते               मी मह्णालो तसल काही मला चालत का?ती म्हणाली, बिना घेता बायकोला कुणी असं म्हणत का?’ घरोघरी मातीच्याच चुली’ जणू याचाच प्रत्यय अनेकांना कवितेमधून आला. नवरा बायकोच्या भांडणाचे फायदे तोटेही त्यांनी काव्यपंक्तीतून उलगडून सांगितले.                  

टॅग्स :PuneपुणेkojagariकोजागिरीLokmatलोकमतcultureसांस्कृतिक