शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा दंगल : चौकशी आयोगाचे काम ५ सप्टेंबरपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:24 IST

आयोगापुढे सुमारे ५०० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येणार

मुंबई : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आयोगाचे कामकाज ५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या आयोगाचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे.एन. पटेल आहेत. पटेल हे कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही होते. तर राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक हे या आयोगाचे सदस्य आहेत.आयोगापुढे सुमारे ५०० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. सुनावणीच्या सुरुवातीलाच एक डझन साक्षीदारांची साक्ष म्हणजेच १२ नोंदविण्यात येईल. आयोगात १०,००० पानी कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत, असे विशेष सरकारी वकील शिशिर हिरये यांनी सांगितले.दंगलीचे कारण आणि परिणाम याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. त्याशिवाय १ जानेवारी रोजी पोलिसांनी आणि प्रशासनाने पुरेशी व्यवस्था केली होती का, याचीही चौकशी करण्यात येणार आहे. दंगलीच्या घटनाक्रमाप्रमाणेच या दंगलीला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीची, संस्थेची आणि गटाचीही आयोग चौकशी करणार आहे. तसेच दोन लाख दलित घटनास्थळावर जमा झाले होते तेव्हा त्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था कशी होती, याचीही चौकशी केली जाणार आहे.कोरेगाव भीमा दंगलीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी होईल, असे आश्वासन देत ९ फेब्रुवारी रोजी चार महिन्यांच्या कालावधीसाठी आयोगाची नियुक्ती केली.हिरये यांच्या म्हणण्यानुसार, आयोगाने घटनास्थळी भेट दिली असून तेथील फोटो आणि व्हिडीओ घेतले आहेत. त्याशिवाय महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत.आयोगापुढे ५०० प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. त्यात पुणे ग्रामीण पोलीस, काही संस्था व एनजीओंचाही समावेश आहे. तसेच या दंगल प्रकरणाचे मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांनीही प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.कोरेगाव भीमा दंगलीनंतर २ जानेवारी रोजी पुणे पोलिसांनी मिलिंद एकबोटे व शिवप्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा नोंदविला. मिलिंद एकबोटे यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणे