शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँकांसाठी नॉलेज हब उभारणार : नागरी सहकारी बँकेच्या बैठकीतील निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 19:42 IST

एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन पैसे लुटून नेण्याच्या प्रकारात अलिकडच्या काळात वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध बँकांना आलेल्या अनुभवाचे, त्यांनी त्यावर केलेल्या उपाययोजनांची देवाणघेवाण करण्यासाठी नॉलेज हब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देकॉसमॉस बँकेवरील सायबर दरोड्याच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णयसायबर हल्ला , डेबिट कार्ड क्लोनिंग याच्यावर अडचणींची देवाणघेवाण शक्य

पुणे : देशातील बँकींग क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या कॉसमॉस बँकेवरील सायबर दरोड्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत नागरी सहकारी बँक असोसिएशनने नॉलेज हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. डेबिट कार्ड क्लोनिंग, सायबर हल्ला, लेखापरीक्षणातील त्रुटी अशा विविध अडचणींची देवाणघेवाण आणि त्यावरील उपायांची माहिती या हबच्या माध्यमातून बँकांना उपलब्ध करुन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. देशातील दुसऱ्या क्रमांकाची शेड्युल्ड को आॅपरेटीव्ह बँक म्हणून कॉसमॉस बँक मानली जाते. या बँकेवर ११ आणि १३ आॅगस्ट रोजी झालेल्या सायबर हल्ल्यात तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटुन नेले होते. विदेशातील एटीएमबरोबरच पुणे,कोल्हापूर आणि देशातील विविध एटीएममधून देखील पैसे काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीसाठी तावरे कॉलनीतील पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या मुख्यालयात शनिवारी बैठक बोलावण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली आणि सोलापूरमधील बँकांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान प्रमुख उपस्थित होते. या शिवाय माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ निरंजन फडके आणि मोहन कामत यांनी बँक प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन पैसे लुटून नेण्याच्या प्रकारात अलिकडच्या काळात वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध बँकांना आलेल्या अनुभवाचे, त्यांनी त्यावर केलेल्या उपाययोजनांची देवाणघेवाण करण्यासाठी नॉलेज हब उभारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या शिवाय लेखापरीक्षण इतर अडचणींबाबतही या नॉलेज हबची बँकांना मदत होणार आहे. स्वत:चे डाटा सेंटर असणाऱ्या बँका, अर्धे डाटा सेंटर स्वत:चे आणि अर्धे डाटा सेंटरचे काम बाहेरच्या कंपनीकडून करुन घेणारे अथवा संपूर्ण काम बाहरेच्या कंपनीला दिलेल्या बँका यांनी कोणती खबरदारी घ्यावी याच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या. या बाबत माहिती देताना महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर म्हणाले, कॉसमॉस बँकेच्या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नॉलेज हब उभारण्यात येणार असून पुण्याच्या संघटनेपासून याची सुरुवात होईल. राज्य फेडरेशन देखील असेच हब उभारेल. त्यामुळे सायबर हल्ला , डेबिट कार्ड क्लोनिंग याच्यावर अडचणींची देवाणघेवाण शक्य होईल.  

टॅग्स :PuneपुणेbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र