शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्षपदी कीर्ती शिलेदार यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 21:23 IST

गेल्या अनेक वर्षांपासून नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार यांचे नाव चर्चेत होते. परिषदेच्या निवडणूकांमुळे संमेलनाध्यक्षपदासह संमेलन तारखा आणि स्थळ घोषित करण्यास विलंब लागला होता.

ठळक मुद्देमुंबईत १३ ते १५ जूनला होणार  संंमेलन , पुण्याला तब्बल ७ वर्षांनी संमेलनाध्यक्षाचा मिळाला मान

पुणे : ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्षाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांची गुरूवारी एकमताने निवड झाली. ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्यानंतर तब्बल सात वर्षांनी पुण्यातील ज्येष्ठ रंगकर्मीला संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी जयमाला शिलेदार यांनीही नगर येथे झालेल्या ८३व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या इतिहासात आई आणि मुलगी अशा दोघींना हा सन्मान मिळण्याची पहिलीच वेळ आहे. येत्या १३ ते १५ जूनला मुंबईमध्ये हे नाट्य संमेलन होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार यांचे नाव चर्चेत होते. परिषदेच्या निवडणूकांमुळे संमेलनाध्यक्षपदासह संमेलन तारखा आणि स्थळ घोषित करण्यास विलंब लागला होता. मात्र ६ एप्रिलला मध्यवर्ती नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी यांची निवड झाल्यानंतर मुंबई येथे गुरूवारी नियामक मंडळाच्या कार्यकारिणीची पहिली बैठक पार पडली. यंदा संमेलनाध्यक्षपदासाठी नियामक मंडळाकडे कीर्ती शिलेदार, सुरेश साखवळकर आणि श्रीनिवास भणगे असे तीन अर्ज आले होते. नियामक मंडळाच्या बैठकीत कीर्ती शिलेदार यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले. यापूर्वी पुण्यातील ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची २०११ मध्ये सांगली येथे झालेल्या नाट्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाली होती. तब्बल सात वर्षांनी हा मान पुण्याला मिळाला आहे. कीर्ती शिलेदार यांनी आई आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताची आराधना करीत दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेची पदवी कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४००० हून अधिक प्रयोग झाले आहेत. देशातल्या मराठी रसिकांसाठी त्यांनी देशाच्या विविध शहरात मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रांसह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचविला. रंगभूमीवर भूमिका रंगवताना त्यांनी नेहमी अभ्यासपूर्ण सौंदर्यशोध घेतला. त्यामुळेच त्यांच्या भूमिका आगळ्या आणि वैशिष्टयपूर्ण ठरल्या. त्यांनी  ‘स्वर ताल शब्द संगती’ या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे.  

  

टॅग्स :Puneपुणे