शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीतील फसवणूक प्रकरणी किरण गोसावीला पाच दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 17:55 IST

पुणे शहर पोलीसांनी लष्कर आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यात गोसावी याला अटक केली. दरम्यान, भोसरीतील फसवणुक प्रकरणात भोसरी पोलीसांनी गोसावी याला सोमवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पिंपरी : परदेशात नोकरी लावतो असे सांगून फसवणुक केल्याप्रकरणी भोसरी पोलीसांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील (Aryan Khan Drugs Case) एनसीबीचा मुख्य साक्षीदार किरण गोसावी (Kiran Gosavi) याला सोमवारी (दि. २२) अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. किरण प्रकाश गोसावी (वय ३६, रा. ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विजयकुमार सिद्धलिंग कानडे (वय ३३, रा. शिवशंकर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

फिर्यादी कानडे हे नोकरी शोधत होते. एका जॉब पोर्टल वरून त्यांना ई-मेल आला. गोसावी याने कानडे यांना ब्रुनेई येथे नोकरी लावतो, असे सांगितले. त्यासाठी अडीच लाख रुपये फी सांगितली. नोकरीची गरज असल्याने कानडे यांनी ठाणे येथील कार्यालयात जाऊन गोसावीला वेळोवेळी पैसे दिले. त्यानंतर नोकरी पक्की झाली आहे. विमानाचे तिकीट आणि व्हिसा पाठवला. मात्र, त्यानंतर गोसावी याने कानडे यांचे कॉल उचलणे बंद केले. त्यानंतर कानडे यांना गोसावीचा कोणताही ठावठिकाणा मिळत नव्हता.

कूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात किरण गोसावीचे नाव आल्यानंतर आणि टिव्हीवर गोसावीची बातमी पाहिल्यावर फसविणारा किरण गोसावीच आहे याची खात्री कानडे यांना झाली. त्यानंतर कानडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. पुणे शहर पोलीसांनी लष्कर आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यात गोसावी याला अटक केली. दरम्यान, भोसरीतील फसवणुक प्रकरणात भोसरी पोलीसांनी गोसावी याला सोमवारी (दि. २२) अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

टॅग्स :PuneपुणेAryan Khanआर्यन खानDrugsअमली पदार्थPoliceपोलिसArrestअटक