शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयिन मुलीचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 00:40 IST

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यासाठी आपल्या अल्पवयीन मुलाला मदत केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली

लोणी काळभोर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यासाठी आपल्या अल्पवयीन मुलाला मदत केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली असून, पोलिसांनी अपहरण व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. आज मुलाच्या वडिलांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. अल्पवयीन मुलाला आज बालन्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अल्पवयीन मुलगा व अल्पवयीन मुलगी हडपसर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. आॅक्टोबर २०१८ मध्ये या मुलाने पीडित मुलीला तू मला खूप आवडते, आपण लग्न करू, असे सांगितले होते. परंतु पीडित मुलीने त्याकडे दुर्लक्ष केले होते.२१ डिसेंबरला किरकोळ कारणावरून आई-वडील बोलतात, म्हणून पीडित मुलगी रागाने सकाळी आठ वाजता महाविद्यालयात गेली होती. तेथे जाऊन ती रडत बसली होती. त्यावेळी या मुलाने तिची विचारपूस केली. यावेळी मुलीने आई-वडील किरकोळ कारणावरून सतत बोलत असतात, म्हणून मी आत्महत्या करणार असल्याचे त्याला सांगितले. त्या मुलाने तिला समजावले व स्वत:च्या घरी नेले. त्यावेळी मुलाच्या आई-वडिलांनी आता तुझ्या घरी जाऊ नकोस, आपण लग्न करू, मग तू आमच्याबरोबर राहा, असे मुलीला सांगितले. मुलाच्या वडिलांनी त्या दोघांना दिंडोरी (जि. नाशिक) येथील एका नातेवाईकाच्या घरी नेऊन सोडले व वडील स्वत:च्या घरी निघून गेले. यानंतर या मुलाने आपले लग्न होणार आहे, असे सांगून पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवले.पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले अधिक तपास करीत आहेत.या पीडित मुलीच्या घरच्यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीचा तपास केला असता ती पीडित मुलगी दिंडोरी येथे असल्याची माहिती मिळाली. २५ डिसेंबरला दोघांना प्रथम दिंडोरी पोलीस ठाण्यात व नंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. नंतर वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला पुण्यातील शासकीय रुग्णालयात नेले असता तिने वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्या दिवशी वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. नंतर पीडित मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन माहिती विचारली असता तिने खरी हकिकत सांगितली. आपण आता लग्न करणार असल्याने आपल्या शारीरिक संबंधाबाबतीत कुणाला काहीही सांगू नकोस, असे या मुलाने सांगितल्यामुळे पीडित मुलीने वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नकार दिला होता.

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी