शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
2
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
3
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
4
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
5
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
6
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
7
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
8
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
9
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
10
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
11
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
12
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
13
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
14
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
15
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
16
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
17
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
19
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
20
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
Daily Top 2Weekly Top 5

खेडच्या शिवराज राक्षेने जिंकला ‘महाबली’ किताब, जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 02:40 IST

नांदेड सिटी येथील आयोजित महारष्ट्र केसरीसाठीच्या जिल्हा कुस्ती संघ निवड चाचणी स्पर्धेत खेडच्या शिवराज राक्षे याने पुणे जिल्हा महाबली किताब जिंकला. डिसेंबर महिन्यात भूगाव येथे होणाºया ६१व्या महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आयोजित केलेल्या जिल्हा कुस्ती संघ निवड चाचणी स्पर्धेचा समारोप झाला.

खडकवासला: नांदेड सिटी येथील आयोजित महारष्ट्र केसरीसाठीच्या जिल्हा कुस्ती संघ निवड चाचणी स्पर्धेत खेडच्या शिवराज राक्षे याने पुणे जिल्हा महाबली किताब जिंकला. डिसेंबर महिन्यात भूगाव येथे होणाºया ६१व्या महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आयोजित केलेल्या जिल्हा कुस्ती संघ निवड चाचणी स्पर्धेचा समारोप झाला. सिंहगड रस्त्यावर नांदेड येथे वस्ताद रामभाऊ कार्ले क्रीडानगरीमध्ये दोन दिवसांपासून या स्पर्धा सुरू होत्या.आमदार भीमराव तापकीर, माजी आमदार बापूसाहेब पठारे, मंगलदास बांदल, नगरसेवक हरिदास चरवड, अमोल बराटे, जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीपअप्पा भोंडवे, उपाध्यक्ष मारुती आडकर, कार्याध्यक्ष विलास कथुरे, सचिव किसन बुचडे, रमेश कोंडे, काका चव्हाण आदीउपस्थित होते.हवेली तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पैलवान उमेश कार्ले, विकास लगड, किशोर माने, गणेश घुले, रमेशआबा लगड आणि नांदेड ग्रामस्थांनी या स्पधेर्चे संयोजन केले होते. जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे देण्यात येणाºया पुरस्काचे वितरण यावेळी करण्यात आले. उत्कृष्ट कुस्तीगीर उत्कर्ष काळे यांना उत्कृष्ट संघटक मारुती आडकर, उत्कृष्ट मार्गदर्शक सुनील लिम्हण, उत्कृष्ट पंच मोहन खोपडे आणि होतकरू मल्ल शिवराज राक्षे यांना प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र केसरी गटासाठी माती विभागात मुळशीच्या मुन्ना झुंझुरके याने बारामतीच्या भारत मदणे याच्यावर ११ विरुद्ध १ असा तांत्रिक गुणाधिक्क्याने विजय मिळवला. तर गादी विभागात खेडच्या शिवराज राक्षे यांनी शिरूरच्या सचिन येलभर यांच्यावर ११ विरूद्ध १ असा दुहेरी पटावर तांत्रिक गुणाधिक्क्याने विजय मिळवला.शिवराज राक्षे ‘महाबली’महाराष्ट्र केसरीच्या धर्तीवर पुणे जिल्हा अंतर्गत खुल्या वजन गटातील गादी विभागातील विजेता व माती विभागातील विजेता यांच्यामध्ये महाबली किताबासाठी गादीवर झालेली लढत कुस्तीप्रेमींचे आकर्षक होते. शिवराज राक्षे आणि मुण्णा झुंझुरके यांच्यात ही कुस्ती झाली. शिवराज राक्षे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेत १० विरूध्द ० असा विजय मिळवला. विजेत्यास पुणे जिल्हा महाबली किताब व दीड किलो चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.भूगावात महाराष्ट्र केसरी६१ व्या महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २० ते २४ डिसेंबर रोजी मुळशी तालुक्यात भूगाव येथे होणार आहेत. या स्पर्धेचा मान १२ वर्षांनंतर पुणे जिल्ह्यास मिळाला आहे. जिल्हा कुस्तीगीर संघ यजमान असल्याचे दोन संघ असणार आहे. त्यामुळे गादी विभागात दोन मल्लांना संधी मिळणार आहे. शिवराज राक्षे आणि सचिन येलभर गादी विभागातून तर मुन्ना झुंझुरके माती विभागातून स्पर्धेत खेळतील.भूमीपुत्रांना कुस्ती लावण्याचा मानकुस्ती प्रेमींनी तुडुंब भरलेल्या वस्ताद रामभाऊ कारले क्रीडानगरीमध्ये आभार प्रदर्शन करताना हवेली तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष उमेश कारले यांना कुस्ती प्रेमापोटी जमलेल्या सर्व जनसमुदाय पाहून अश्रू अनावर झाले. त्यांच्या आवाहनानुसार महाबली किताबाची कुस्ती नांदेड गावच्या तरुणांच्या हस्ते लावण्यात आली.मानधन योजना प्रेरक : बांदलनावलौकिक वाढविण्यासाठी कुस्तीवर मनापासून प्रेम केले पाहिजे या कुस्तीस्पर्धेतून महाराष्ट्राची मान उंचावली आहे. कुस्तीची परंपरा जतन करण्यासाठी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाने सुरू केलेली मानधन योजना मल्लांसाठी प्रेरक ठरेल, असे मत माजी सभापती मंगलदास बांदल यांनी व्यक्त केले.निकाल : वजनगट-विजेता-उपविजेता या क्रमानेकुमार गट (१७ वर्षांखलील)- ४५ किलो- विपुल थोरात (इंदापूर) योगीराज टोणपे (खेड), ४८ किलो- निखिल वाघ (आंबेगाव) मयूर मोटे (पुरंदर ), ५१ किलो- संकेत ठाकुर (मावळ) प्रवीण हरणावळ (इंदापूर), ५५ किलो- रोहन थोपटे (भोर) अजित तावरे (बारामती), ६० किलो- कौशल मानेरे ( मुळशी) संग्राम जगताप (पुरंदर), ६५ किलो- शिवाजी वाकणे (मुळाशी) कौस्तुभ बोराटे (हवेली), ७१ किलो- अनिल कडू (मावळ) सूरज माने (दौंड), ८० किलो- आनंद मोहोळ (मुळाशी) अंबर सातव (हवेली), ९२ किलो- विनायक वाल्हेकर (भोर) श्रेयस होळकर (शिरूर), ११० किलो- मंदार ववले (मुळशी) हृषीकेश देवकाते (बारामती).गादी विभाग खुला गट - ५७ किलो-स्वप्निल शेलार (बारामती) अजिंक्य भिलारे (मुळाशी), ६१ किलो- तुकाराम शितोळे (हवेली) अतीश आडकर (मावळ),६५ किलो- सागर लोखंडे (खेड) आबा शेंडगे (शिरूर), ७० किलो- दिनेश मोकाशी (बारामती) अक्षय चव्हाण (दौंड), ७४ किलो- बाळासो डोबाळे (इंदापूर) गौरव शेटे (भोर), ७९ किलो- अक्षय चोरघे (हवेली) मंजूर शेख (इंदापूर), ८६ किलो- अनिकेत खोपडे( भोर) सचिन रणुसे(वेल्हा), ९२ किलो- केदार खोपडे (भोर) विक्रम पिवळे (मुळाशी), ९७ किलो- आदर्श गुंड (खेड) सोनबा काळे (हवेली).माती विभाग खुला गट - ५७ किलो-सागर मारकड (इंदापूर) सागर भेगडे (मुळशी), ६१ किलो- सूरज कोकाटे (इंदापूर) देविदास निबळे (मावळ), ६५ किलो- अनिल कचरे ( इंदापूर) पोपट पालवे (बारामती), ७० किलो- अरूण केंगले (खेड) स्वप्निल दोन्हे ( दौंड), ७४ किलो- इम्रान शेख (इंदापूर) अमोल धरपाळे (वेल्हा), ७९ किलो-नागेश राक्षे (मावळ) सद्दाम जमादार (इंदापूर), ८६ किलो- संतोष पडळकर (बारामती) तुषार पवार (इंदापूर), ९२ किलो- विक्रम घोरपडे (इंदापूर) शंकर माने (बारामती),९७ किलो- विकास येनपुरे (मावळ) अभिजित जमादार (भोर).

टॅग्स :Puneपुणे