शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

खोरला पोहोचले पुरंदर उपसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 02:29 IST

डोंबेवाडी तलावातील पाण्याचे पूजन; पुरंदर योजनेतून दौंड जिरायत भागाला पाणी देण्याची मागणी

खोर : अनेक दिवसांपासून पुरंदर योजनेतून दौंड तालुक्याच्या जिरायत भागाला पाणी देण्यात यावे, अशी मागणी होती. यानुसार आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांतून पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून खोर (ता. दौंड) येथील डोंबेवाडी तलावत पाणी सोडण्यात आले असून, त्याचे जलपूजन आमदार कुल यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी आमदार कुल म्हणाले, की आपण पाण्यासंदर्भात उशिरा मागणी करीत असतो. त्यामुळे सिंचन योजनेचे पाणी बंद व्हायला आणि तुम्ही पाणी मागायला एकच वेळ होत असते. त्यामुळे खोर परिसरातील तलाव पूर्ण भरू जात नाहीत व देऊळगावगाडा व खालील भागाला या पाण्याचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे येथून पुढे पाण्याची मागणी शेतकऱ्यांनी मे महिन्यामध्ये करावी व त्यानुसार पाण्याचे नियोजन होऊन पाणी वेळेवर सुटून या भागामधील सर्वच गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. शासन शेतकरीवर्गाच्या पाठीशी उभे असून त्याचा फायदा शेतकरी बांधवांनी घ्यावा. असे आवाहन कुल यांनी केले.या वेळी ग्रामस्थांनी अजून एक आवर्तन पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून डोंबेवाडी तलावात दिवाळी झाल्यानंतर सोडण्याची मागणी केली आहे. यावर कुल म्हणाले, मलादेखील पाण्याचा अंदाज येत नाही. कारण सध्या पाऊसच झाला नसल्याने सर्वच ठिकाणची पाण्याची पातळी खालावली आहे. मात्र माझी अजून एक आवर्तन सोडण्याच्या बाबतीत सिंचन विभागाच्या अधिकारी वर्गाबरोबर मीटिंग चालू असून लवकरच दुसरे आवर्तन सोडण्यास प्रयत्नशील राहणार आहे.|या प्रसंगी सरपंच सुभाष चौधरी, दिलीप डोंबे, विजय कुदळे, मधुकर चव्हाण, भानुदास डोंबे, गणेश साळुंंखे, जालिंंदर डोंबे, पांडुरंग डोंबे, शिवाजी पिसे, पोपट चौधरी, राहुल चौधरी, शिवाजी चौधरी, सुहास चौधरी, हनुमंत चौधरी, राजेंद्र डोंबे, विकास चौधरी, मेहबूब पठाण, तानाजी डोंबे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थितीत होते.दौंड तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती आहे. या भागामधील ग्रामस्थांनी आमदार कुल यांच्याकडे पुरंदर जलसिंचन उपास योजेनेतून पाणी डोंबेवाडी तालावात सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार कुल यांनी स्थानिक नागरिक व सरपंच यांना विचारात घेऊन पुणे-मुंबई येथील सिंचन भवनावर सिंचन योजनेचे अधिकारी व प्रशासन, शासन यांच्यासोबत बैठक घेतली.सर्वप्रथम डोंबेवाडी तलाव हा पुरंदर सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये घेतला. त्यानंतर ही सर्व प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करून जवळपास एक आठवडा डोंबेवाडी तलावामध्ये पाणी सोडण्यात आले असल्याने खोर ग्रामस्थांनी कुल यांचे अभिनंदन व पाणीप्रश्न सुटल्याने समाधान व्यक्त केले.जिरायती भागाकडे माझे संपूर्ण लक्ष असून या भागातील शेतकरीवर्गाच्या अडीअडचणी सोडविण्यासंदर्भात मी कायमस्वरूपी कटिबद्ध राहीन. तुम्हीसुद्धा कुठल्याही प्रकारचे गटातटाचे राजकारण न करता पाण्याच्या संदर्भामध्ये एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. येथून मागील काळात शेतकºयांना ५० टक्के रक्कम भरावी लागत होती; परंतु आता १९ टक्केच रक्कम भरावी लागणार असून बाकीची रक्कम शासन भरणार आहे. त्यामुळे पाणी आणणे ही काय कठीण बाब नाही, असे कुल म्हणाले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई