लोणावळा : लोणावळा व खंडाळा परिसरात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे खंडाळा गावठाण येथे वड व गुलमोहराचे झाड एका गाडीवर पडले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नाही. लोणावळा परिसरात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे, त्यातच शनिवारी रात्री पावसाच्या सोबत वारादेखील राहिल्याने खंडाळ्यात दोन मोठी झाडे पडली आहेत. माजी नगरसेवक विजय सिनकर यांनी या घटनेची माहिती नगरपरिषदेला दिली.डोंगरगाव येतील 150 घरे अंधारातलोणावळा नजीकच्या डोंगरगाव वेताळनगर येथील डी. पी. खराब झाल्यामुळे येथील सुमारे दीडशे घराना अंधारात रहावे लागले आहे. येथील उघड्या डी. पी. चे काम करा याबाबत वीज वितरण कंपनीला वारंवार तक्रारी व सूचना करून देखील अधिकारी लक्ष घालत नसल्याने नागरिकांवर आज अंधारात राहण्याची वेळ आली असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
खंडाळा गावठाणात वड व गुलमोहराची झाडे पडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 07:29 IST