शिरूर : शिरूर शहर विकास आघाडी, तसेच शहर काँग्रेसचे अध्यक्ष केशरसिंग खुशालसिंग परदेशी (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नगर परिषदेवर सध्या शहर विकास आघाडीची सत्ता असून, आघाडीचे अध्यक्ष म्हणून परदेशी कार्यरत होते. २००७ पासून नगर परिषदेवर रसिकलाल धारिवाल यांच्यासमवेत त्यांनी किंगमेकर म्हणून भूमिका बजावली. नगर परिषदेच्या कारभारात त्यांचा शब्द प्रमाण मानला जाई. शहराच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. परदेशी गेली ३० वर्षे काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. ग्रामीण रुग्णालयाचे स्थलांतर न होण्याबाबत, तसेच टपरी पुनर्वसनाबाबत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शिवसेवा मंडळ ट्रस्टचे सचिव, रामलिंग ट्रस्टचे विश्वस्त म्हणूनही ते कार्यरत होते. ४० वर्षांपासून त्यांचा रामलिंग पालखी सोहळ्यात भाग होता. अंत्ययात्रे वेळी माजी आमदार अॅड. अशोक पवार, पोपटराव गावडे, नगर परिषद सभागृहनेते प्रकाश धारिवाल, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्यासह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
केशरसिंग परदेशी यांचे निधन
By admin | Updated: October 6, 2016 03:42 IST