टोमॅटो खरेदीचे दर ८ ते २ वा पर्यंत सारखेच ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:08 AM2021-06-18T04:08:09+5:302021-06-18T04:08:09+5:30

दरम्यान, नारायणगाव येथील उपबाजार केंद्रातील तीन टोमॅटो व्यापाऱ्यांचे परवाने यापूर्वी रद्द करण्यात आले आहेत अशी माहिती ॲड. काळे यांनी ...

Keep tomato purchase rates the same from 8th to 2nd | टोमॅटो खरेदीचे दर ८ ते २ वा पर्यंत सारखेच ठेवा

टोमॅटो खरेदीचे दर ८ ते २ वा पर्यंत सारखेच ठेवा

Next

दरम्यान, नारायणगाव येथील उपबाजार केंद्रातील तीन टोमॅटो व्यापाऱ्यांचे परवाने यापूर्वी रद्द करण्यात आले आहेत अशी माहिती ॲड. काळे यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे नारायणगाव उपबाजार केंद्र टोमॅटोसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना टोमॅटोचे सकाळी एक बाजारभाव, तर दुपारी त्यापेक्षा कमी बाजारभाव मिळत असल्याचे निदर्शनास येताच सभापती ॲड. संजय काळे यांनी सर्व टोमॅटो व्यापारी यांची बैठक नारायणगाव उपबाजार केंद्रात घेतली. या बैठकीला उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक निवृत्ती काळे, सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद धोंगडे व सर्व टोमॅटो व्यापारी उपस्थित होते.

सर्व व्यापाऱ्यांनी टोमॅटोची खरेदी सकाळी ८ वा. सुरू करून सकाळी असणारे बाजारभाव दुपारी २ वाजेपर्यंत सारखेच ठेवावे. तसेच टोमॅटोची प्रतवारी व ग्रेडिंगनुसार मालाची विक्री करावी अशी मागणी शेतकऱ्यांची होती. या मागणीस अनुकूलता दर्शवून सभापती ॲड. संजय काळे यांनी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत टोमॅटोचे दर सारखेच ठेवावेत अशी सूचना व्यापाऱ्यांना केली. टोमॅटोच्या खरेदीसाठी परराज्यातील व्यापारी बांधवांशी संपर्क करण्यात आला आहे, लवकरच हे व्यापारी खरेदीसाठी येणार आहेत अशी माहिती सभापती ॲड. संजय काळे यांनी दिली.

उपबाजार केंद्रातील टोमॅटो परवानाधारक महेश मधुकर शिंगोटे, संदीप सखाराम काकडे, सुजित सुभाष चव्हाण व मदतनीस सूरज दीपक अडसरे यांचे टोमॅटो व्यापारी लायसन्स रद्द करण्यात आलेले आहे. या व्यापाऱ्यांशी शेतकरी बांधवांनी कोणतेही आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार बाजार समितीच्या आवारात अथवा आवाराच्या बाहेर करू नये असे सभापती ॲड. संजय काळे यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर अंतर्गत असलेल्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रातील टोमॅटो व्यापाऱ्यांशी संवाद साधताना सभापती ॲड. संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक निवृत्ती काळे, सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद धोंगडे हे उपस्थित होते.

Web Title: Keep tomato purchase rates the same from 8th to 2nd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.