शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

अमूल्य ठेवा एनएफएआयकडे

By admin | Updated: July 6, 2017 03:49 IST

राजा परांजपे, सुलोचनादीदी, इंदिरा संत, बेबी शकुंतला, कुसुम देशपांडे, राजा गोसावी अशा अनेक मोठ्या कलाकारांची चित्रपटांमधील छायाचित्रे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राजा परांजपे, सुलोचनादीदी, इंदिरा संत, बेबी शकुंतला, कुसुम देशपांडे, राजा गोसावी अशा अनेक मोठ्या कलाकारांची चित्रपटांमधील छायाचित्रे ७० वर्षांनंतर समोर आली आहेत. जागा भाड्याने देणे आहे (१९४९), वर पाहिजे (१९५०), शारदा (१९५१), नरवीर तानाजी (१९५२), इन मीन साडेतीन (१९५४), तीन मुले (१९५४) अशा मराठी चित्रपटांचा समृद्ध वारसा दर्शविणाऱ्या चित्रपटांमधील प्रसिद्ध छायाचित्रकार सदानंद आजरेकर यांनी काढलेल्या छायाचित्रांचा अमूल्य ठेवा त्यांची कन्या शांभवी बाळ यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्त केला. आजरेकर यांनी काढलेली ही छायाचित्रे त्यांच्या कन्या शांभवी बाळ यांनी आस्थेने जपून ठेवली होती. १९४२ ते १९५६ या कालावधीत काढलेली ही छायाचित्रे कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना आहेत. आजरेकर हे चित्रपटसृष्टीत ‘जॉनी’ या नावाने प्रसिद्ध होते. आचार्य अत्रे व मास्टर विनायक यांच्या नवयुग स्टुडिओमध्ये तसेच प्रभात फिल्म कंपनीमध्ये ते छायाचित्रकार म्हणून काम करत होते. या काळात विविध चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान काढलेल्या छायाचित्रांचा यामध्ये समावेश आहे. आजरेकर यांनी १९५६ नंतर वैयक्तिक स्तरावर छायाचित्रणाचे काम सुरू केले. त्यासाठी त्यांनी टिळक रस्त्यावर अशोक स्टुडिओ सुरू केला. या काळातीलही छायाचित्रे यामध्ये आहेत. या छायाचित्रांमुळे मराठी चित्रपटांचा मोठा पट उलगडला गेला आहे.‘संग्रहालयात प्रशिक्षण घेणाऱ्या रुची शेवडे या विद्यार्थिनीमुळे हा ठेवा उपलब्ध झाला आहे. सर्व छायाचित्रांचे डिजिटायझेशन करणार आहोत. एक हजारपैकी पाचशे छायाचित्रे ओळखता येत असून उर्वरित छायाचित्रांची ओळख पटविण्यासाठी चित्रपट अभ्यासकांची मदत घेतली जाईल,’ अशी माहिती संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली.बाबांनी १.२० एमएमची ही छायाचित्रे रोलिफ्लेक्स कॅमेऱ्यातून काढली असण्याची शक्यता आहे. बाबा काम करीत होते, तेव्हा मी लहान असल्यामुळे तेव्हा फारशी जाणीव नव्हती; पण नंतर हा किती मोठा ठेवा आहे, ते समजत गेले. बाबांच्या पश्चात अनेक वर्षे ठेवा जपून ठेवला; पण तो यापुढेही सुरक्षित राहावा, यासाठी संग्रहालयाकडे सुपूर्द केला आहे. छायाचित्रण करताना प्रकाश किती असला पाहिजे, कोणती लेन्स वापरली पाहिजे, यासाठीची बारीक नजर बाबांकडे होती, म्हणूनच अत्यंत सुंदर कलाकृती ठरतील, अशी ही छायाचित्रे आकार घेऊ शकली. - शांभवी बाळ