शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकने पटकाविला मुळशी सेना चषक : मुन्ना झुंजुरकेवर ५-० ने मात करत पटकावली चांदीची गदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 12:59 IST

पिरंगुट (ता. मुळशी) येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या कौतुक डाफळेने सेना चषक किताब पटकावला. अंतिम फेरीत कौतुकने मुळशीच्या मुन्ना झुंजुरकेचा ५-० असा पराभव केला.

ठळक मुद्देकौतुक डाफळेला विजय शिवतारे यांच्या हस्ते रोख एक लाख रुपये व मानाची चांदीची गदा प्रदानदुसऱ्या निर्णायक फेरीत कौतुकने दोन गुणांची कमाई करीत ५-० अशी आघाडी घेत मिळवला विजय

पौड : पिरंगुट (ता. मुळशी) येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या कौतुक डाफळेने सेना चषक किताब पटकावला. अंतिम फेरीत कौतुकने मुळशीच्या मुन्ना झुंजुरकेचा ५-० असा पराभव केला. कौतुक डाफळेला रोख एक लाख रुपये व मानाची चांदीची गदा जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिरंगुट येथे मुळशी तालुका शिवसेनेतर्फे या राज्यस्तरीय ‘सेना चषक किताब कुस्ती’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी संपर्कप्रमुख सत्यवान उभे, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब चांदेरे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, जिल्हा उपप्रमुख बबनराव दगडे, माजी सभापती बाळासाहेब पवळे, तालुकाप्रमुख प्रकाश भेगडे, अविनाश बलकवडे, बाबासाहेब चिकणे, बाळासाहेब भांडे, शंकर मांडेकर, शांताराम इंगवले, सुनील चांदेरे, वैभव पवळे, दीपक करंजावणे, कुलदीप कोंडे, विजय केदारी, सुरेश मारणे, नानासाहेब मारणे, आबासाहेब शेळके, राजाभाऊ मारणे आदी मान्यवर  उपस्थित होते.  हलगीवादक राजू आवाळे यांच्या हलगीवादनाने मैदानात रंगत आणली. प्रसिद्ध कुस्ती निवेदक शंकरअण्णा पुजारी व बाबाजी लिम्हण यांनी समालोचन केले. अंतिम फेरीत मुन्ना झुंजुरके व कौतुक डाफळे यांच्यात लढत झाली. पहिल्या फेरीत कौतुक ३-०  असा आघाडीवर होता. दुसऱ्या निर्णायक फेरीत कौतुकने दोन गुणांची कमाई करीत ५-० अशी आघाडी घेत विजय मिळवला. उपविजेत्या मुन्ना झुंजुरकेला रोख पन्नास हजार रुपये व चषक देण्यात आला.स्पर्धेच्यानिमित्ताने महाराष्ट्र चॅम्पियन मुन्ना झुंजुरके व उपमहाराष्ट्र केसरी जालन्याचा विलास डोईफोडे यांची बेमुदत निकाली कुस्ती झाली. १० व्या मिनिटाला मुन्ना झुंजुरकेने विलास डोईफोडेला लपेट डावावर चितपट केले. त्याला रोख एक लाख रुपये व चषक देण्यात आला. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPaudपौडPuneपुणे