शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकने पटकाविला मुळशी सेना चषक , मुन्ना झुंजुरकेवर ५-० ने केली मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 02:50 IST

पिरंगुट (ता. मुळशी) येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या कौतुक डाफळेने सेना चषक किताब पटकावला. अंतिम फेरीत कौतुकने मुळशीच्या मुन्ना झुंजुरकेचा ५-० असा पराभव केला. कौतुक डाफळेला रोख एक लाख रुपये व मानाची चांदीची गदा जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

पौड  - पिरंगुट (ता. मुळशी) येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या कौतुक डाफळेने सेना चषक किताब पटकावला. अंतिम फेरीत कौतुकने मुळशीच्या मुन्ना झुंजुरकेचा ५-० असा पराभव केला. कौतुक डाफळेला रोख एक लाख रुपये व मानाची चांदीची गदा जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिरंगुट येथे मुळशी तालुका शिवसेनेतर्फे या राज्यस्तरीय ‘सेना चषक किताब कुस्ती’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्या हस्ते झाले.या वेळी संपर्कप्रमुख सत्यवान उभे, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब चांदेरे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, जिल्हा उपप्रमुख बबनराव दगडे, माजी सभापती बाळासाहेब पवळे, तालुकाप्रमुख प्रकाश भेगडे, अविनाश बलकवडे, बाबासाहेब चिकणे, बाळासाहेब भांडे, शंकर मांडेकर, शांताराम इंगवले, सुनील चांदेरे, वैभव पवळे, दीपक करंजावणे, कुलदीप कोंडे, विजय केदारी, सुरेश मारणे, नानासाहेब मारणे, आबासाहेब शेळके, राजाभाऊ मारणे आदी मान्यवर उपस्थित होते.हलगीवादक राजू आवाळे यांच्या हलगीवादनाने मैदानात रंगत आणली. प्रसिद्ध कुस्ती निवेदक शंकरअण्णा पुजारी व बाबाजी लिम्हण यांनी समालोचन केले. अंतिम फेरीतमुन्ना झुंजुरके व कौतुक डाफळे यांच्यात लढत झाली. पहिल्या फेरीत कौतुक ३-० असा आघाडीवर होता. दुसºया निर्णायक फेरीत कौतुकने दोन गुणांची कमाई करीत ५-० अशी आघाडी घेत विजय मिळवला. उपविजेत्या मुन्ना झुंजुरकेला रोख पन्नास हजार रुपये व चषक देण्यात आला.स्पर्धेच्यानिमित्ताने महाराष्ट्र चॅम्पियन मुन्ना झुंजुरके व उपमहाराष्ट्र केसरी जालन्याचा विलास डोईफोडे यांची बेमुदत निकाली कुस्ती झाली. १० व्या मिनिटाला मुन्ना झुंजुरकेने विलास डोईफोडेला लपेट डावावर चितपट केले. त्याला रोख एक लाख रुपये व चषक देण्यात आला.दरम्यान, शिवसेनानेते खासदार संजय राऊत व माजी आमदारचंद्रकांत मोकाटे यांनी स्पर्धेला सदिच्छा भेट दिली.

टॅग्स :Puneपुणे