शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पर्वतीवर साकारतोय ‘कटक ते अटक’ मराठेशाहीचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 16:11 IST

छत्रपती शिवराय ते शाहू महाराजांपर्यंतची कारकीर्द

ठळक मुद्देदृकश्राव्य माध्यमातून समजणार दैदिप्यमान इतिहासइतिहास नुसताच वाचता येणार नाही तर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून ऐकताही येणार महापालिकेचा प्रकल्प : दोन कोटी रुपयांची तरतूद

लक्ष्मण मोरे - पुणे : छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी, छत्रपती शाहू आदींच्या काळातील मराठेशाहीचा दैदिप्यमान इतिहासपर्वतीवर साकारला जात आहे. महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला असून त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पर्वतीच्या काही पायऱ्या चढून गेल्यानंतर डाव्या हाताला पालिकेचे कै. नवलोजी तावरे उद्यान आहे. या उद्यानातली एक ते सव्वा एकर जागा पडून होती. पुण्यातील महत्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक असलेल्या पर्वतीला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. यासोबतच जिल्ह्यातील आणि राज्यभरातील शाळांच्या सहलीसुद्धा येत असतात. पेशव्यांनी पर्वतीचे मंदिर बांधले. सध्या पर्वतीवर शंकर, विष्णू, कार्तिकेय, गणपती यांची मंदिरे आहेत. यासोबतच एक वस्तू संग्रहालयसुद्धा आहे. पर्वतीवर येणाऱ्या पर्यटक आणि विद्यार्थ्यांना मराठेशाहीचा इतिहास समजावा आणि त्यातून प्रेरणा मिळावी याकरीता या उद्यानात नगरसेवक रघुनाथ गौडा यांच्या निधीमधून कायमस्वरुपी ऐतिहासिक शिल्प साकारण्यात येणार आहे. या शिल्पाच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली असून येत्या काही महिन्यात मराठेशाहीचा इतिहास सर्वांसाठी खुला होणार असल्याचे गौडा यांनी सांगितले. ................

तेरा किल्ल्यांच्या प्रतिकृतीया स्वराज्यसृष्टीत प्रवेश केल्यानंतर समोरच स्वराज्यातील तेरा महत्वाच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहायला मिळणार आहेत. या किल्ल्यांसाठी मोठाले चौथरे उभे करण्यात आले असून तेथे किल्ल्यांचा इतिहास नुसताच वाचता येणार नाही तर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून ऐकताही येणार आहे. नागरिक प्रशस्त जागेतून फिरत फिरत या किल्ल्यांचा इतिहास समजावून घेऊन शकणार आहेत. हे किल्ले शिल्पकार अभिजीत धोंडफळे यांनी तयार केले आहेत.            

टॅग्स :Puneपुणेparvati-acपर्वतीhistoryइतिहासliteratureसाहित्यtourismपर्यटन